Skip to main content

कला

स्वप्नांचे कवडसे

लेखक शिवोऽहम् यांनी शनिवार, 29/04/2017 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
लँग्स्टन ह्यु या अमेरिकन कवीची ही एक कविता फार आवडली, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न. प‌ंखांसार‌खे हात‌ प‌स‌रून‌ स्व‌च्छ‌ उन्हात‌ नाह‌त‌ स्व‌त:भोव‌ती गिर‌क्या घेत‌ र‌हाव‌ं, नाचाव‌ं सूर्य‌ माव‌ळेस्तोव‌र‌.. आणि म‌ग‌ खुशाल‌ प‌हुडाव‌ं गार‌ वार‌ं अंगाव‌र‌ घेत‌ उंच, डेरेदार‌ वृक्षाच्या छायेत‌ स‌ंध्याकाळी आणि रात्र‌ अल‌ग‌द‌ उत‌रावी काळीसाव‌ळी, माझ्यासार‌खी. अस‌ं माझ‌ं स्व‌प्न‌ आहे.. प‌ंखांसार‌खे हात‌ प‌स‌रून‌ ट‌ळ‌ट‌ळीत‌ उष्ण दुपारी नाचाव‌ं! गिर‌क्या घ्याव्या!

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

लेखक खेडूत यांनी बुधवार, 26/04/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
h . . (प्रासंगिक) सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत. एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती.

काही प्रश्न - रामदास यांना

लेखक अश्फाक यांनी गुरुवार, 06/04/2017 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
1)वीरकरने दमण एअरपोर्ट वरुन जोशीला पकडून आणल का?? 2)ह्यात जो तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला?? 3) माधुरीने गेम केला की विनीताने पिल्लै सोबत मिळून ? 4) 50 लाखा चा चेक घ्यायला कोण आला होता ? 5) मेहता आनी संदीप बहल चे सेटिन्ग आहे का ? कृपया पिसिजेसि चा शेवटचा भाग लिहून मिपकरांना उपकृत करावे ही विनंती . लोभ असावा .

छापू का?

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 06/04/2017 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू.

स्पेशल महापुरूष

लेखक परशु सोंडगे यांनी मंगळवार, 04/04/2017 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
आता आता कुठं तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष एका एका जातीचा एक एक स्पशेल महापुरूष मग अपोआपचं वाटले गेली रंग, तळी, डोंगर नदया ,गाव नि गल्ल्या बोळी,मोहल्ले कॅलेडरवरल्या तारखासुध्दा सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने जो तो विणत गेला आपल्याच जातीचं कोष गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत माणूसजाती जातीच्या कशाल्याशा गर्वानं फुगून फुटू लागली सा-यांचीचं छाताडं.
काव्यरस

तमाशा

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी सोमवार, 03/04/2017 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्र निघाला की गावागावात यात्रांचा हंगाम सुरू व्हायचा. खेड्यातील या यात्रांमध्ये तमाशा हेच मुख्य आकर्षण. संगीतबारीचा आणि ढोलकीफडाच्या तमाशांचे फड गावोगावी दिवस रात्र रंगू लागायचे. तमाशा खेड्याची लोककला, परंपरा आणि संस्कृती. पठ्ठे बापूराव, विठाबाई भाऊ नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, माया तासगावकर अशी अनेक मंडळी या लोककलेचे शिलेदार. तर काही वारसदार.

मोहीम - २ फलक

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 02/04/2017 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्‍या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे.

निशीगंधाचे उखाणे

लेखक परशु सोंडगे यांनी गुरुवार, 30/03/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रात शांत शांत कशी वारा अबोल जरासा. पेटला धूंदीत गारवा चाहूलीत तू चंद्र जसा. निशीगंधाचे हे उखाणे. अंगी शहारांची रे टिंबे. सांगू नको तू कुणाला प्राणात गोंदले प्रतिबिंबे. परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928
काव्यरस

लाल टांगेवाला

लेखक रासपुतीन यांनी बुधवार, 22/03/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : मतदान

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/03/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, 'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी शतशब्दकथा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्कृष्ट कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. दुसर्‍या वर्षी या स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्यालाही अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. काही तांत्रिक अडचणी आल्या आणि तुमच्या या 'शशक स्पर्धेचा' निकाल लांबणीवर पडला. त्या अडचणी सोडवण्याच्या प्रयत्नात बराच वेळ गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.