Skip to main content

कला

आम्ही दोघीच्या निमित्ताने

लेखक पारा यांनी मंगळवार, 17/04/2018 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल? आम्ही दोघी तसं काहीच करत नाही. कुठल्याच व्यक्तिरेखेशी मी समरस होऊ शकलो नाही. प्रिया बापट आणि तिच्या बाबांमधला असंवाद मला कुठेच स्पर्श करून गेला नाही. त्या दोन्ही व्यक्तिरेखा कोरड्या आणि प्लास्टिकच्या वाटल्या मला. नाही म्हणायला मुक्ता बर्वेचा संयत अभिनय थोडा कुठे मनाला भिडतो, पण तिचा रोल तसा फार नाहीच. गावाकडच्या एका मुलीचं बेअरिंग ती पहिल्या सीनला जे पकडते ते अगदी शेवटपर्यंत.

गाणे कसे बनते?

लेखक arunjoshi123 यांनी बुधवार, 11/04/2018 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो. ------------- कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय? कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी.

वास बापूंचा

लेखक रानरेडा यांनी रविवार, 08/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही ....

"लग्नातल्या फोटोंच्या गंमती जंमती"

लेखक फुटूवाला यांनी सोमवार, 26/03/2018 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल लग्नातले विधी हे फोटोव्हिडीओ मध्ये दिसले पाहिजे म्हणुनच केले जात असल्याचे पाहायला मिळतय. हात देवघरासमोर जोडतात पण पाहतात फोटोग्राफरकडे ते ठीकय पण व्हिडीओकडेही तसेच. या निमीत्त मी लग्नाची जी फोटोशुट केलेली आहेत त्याचे काही किस्से मि.पा.

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/03/2018 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर! खास येथे मिसळपाव वाचकांसाठी देत आहे!) टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर!

प्रिय मायमराठी

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 27/02/2018 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

नाईस टू मीट यू

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 24/02/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता.

मराठी मालिकांची लेखनकृती

लेखक वनफॉरटॅन यांनी मंगळवार, 20/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 26/01/2018 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १): https://www.misalpav.com/node/41194 पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला.

चलत-चित्र पद्मावतीची (रड)कथा आणि वर"करणी" स्वातंत्र्य...!

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 15/01/2018 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
तसे या विषयावर लिहिणारच नव्हतोत, परंतु मि पा वर चर्चा भीमा कोरेगाव वर लेख वाचले, मांदियाळीत चर्चा बहुत होते जाणवले, ततपश्चात "लिहून पाहू" ने झपाटले, आणि शेवटी टंकले...! तसे ऐतिहासिक संदर्भ पाहता आमच्या भूतकाळात आम्ही सदर ईसमाचे चित्रपट पाहिलेले नाहीत. (किंबहुना थेटरात जाऊन पाहिलेले नाहीत म्हणणे जास्त उचित). बाजीराव मस्तानी वा रामलीला चा एकही प्रसंग आमुच्या डोळ्यांसमोरून गेल्याचे आम्हास स्मरत नाही. हे त्यांचे बहुचर्चित चित्रपट.