Skip to main content

कला

बॉलीवूडचे तारे - संजय मिश्रा

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 20/11/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत सुंदर दिसणे खूप जास्त महत्वाचे मानले जाते . गेल्या काही वर्षात मात्र हे सारी समीकरण बदलत चालली आहेत . आलिशान बंगले ,इंपोर्टेड गाड्या , सुटमधे झोपणारे अभिनेते हे फक्त काही निवडक निर्मात्यांच्या चित्रपटामधूनच दिसत आहे . सिनेमा अधिकाधिक सत्य जीवनाच्या जवळ चालला आहे आणि ह्यामुळेच तुमच्या आमच्या सारखे दिसणारे , वावरणारे अभिनेते पडद्यावर ठळकपणे उठून दिसत आहेत .

Making of photo and status : ७. गोलुमोलु

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 19/11/2017 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 काय ? कसं काय ? ठिक आहे ना ? येता का सोबतीला ? जाऊ आपलं सावकाश रांगत रांगत जोडीने नाक्यापर्यंत, दुध आणायला.

रुद्रम

लेखक तिमा यांनी शनिवार, 18/11/2017 03:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्‍या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्‍यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला.

Making of photo and status : ६. च्यामारी !!!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 12/11/2017 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय.

य मजा आणणारा फाफे!

लेखक हर्मायनी यांनी सोमवार, 30/10/2017 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
टॉक करत डोक्यातील विचारचक्रे फिरवणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, आपल्या हुशारीने गुंडाना, देशद्रोह्यांना पकडून देणारा हा सहावी-सातवीत भेटलेला हा सुपरटॅलेंटेड सुपरहिरो विदाउट सुपरपॉवर पुन्हा येतोय हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया होती अर्थातच टॉक!! नवरा देखील फाफे फॅन असल्यामुळे चित्रपट पाहायला जायचा निश्चितच होतं. मग पहिल्या दिवशीच जाऊन आलो. आपल्याला भेटलेला बन्या आता मोठा झालाय. आत्ताच्या पिढीतल्या कोणत्याही मुलाप्रमाणे तोही मोबाइल, इंटरनेटचा पूर्णपणे वापर करतोय. मेडिकलची प्रवेश परीक्षा द्यायला तो पुण्याला भा. रा. भागवतांकडे येतो.

यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 30/10/2017 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे बनेशच्या जिगरी दोस्त शरद शास्त्रीने म्हटलेली ही ओळ ह्या चित्रपटालाही तन्तोतन्त लागू पडते. मुळात फास्टर फेणेची कथा चित्रपट स्वरूपात मान्डणे हे मोठे धाडसाचे काम आहे. धाडसाचे अश्यासाठी की मध्यम वयीन आणि सत्तर ऐशीच्या दशकातील पिढीच्या डोळ्या मनात फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा ठसलेली आहे त्यामुळे त्या व्यक्तीरेखेला जरा जरी धक्का लागला तरी हा प्रयोग फसण्याची भिती होती. तसेच हॅरी पॉटर च्या जमानातल्या नव्या पिढीला फास्टर फेणे ही व्यक्तीरेखा तितकीशी माहीत नाही. त्यामुळे ही व्यक्तीरेखा चित्रपटात उभी करणे हे मोठे धाडसाचे काम होते.

Making of photo and status : ४. टम्म् फुगीर जॅकेट!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 29/10/2017 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या राहिलेल्या मुलाचे जॅकेट पहा, कसे वारा भरल्याने फुग्यासारखे टम्म् फुगले आहे ते !!!

नो रिग्रेट्स

लेखक Anand More यांनी रविवार, 22/10/2017 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही गाणी प्रचंड नशीबवान असतात. मी हे गाणं पहिल्यांदा ऐकलं २०१० मध्ये. म्हणजे हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास ५१ वर्षांनी. क्रिस्तोफर नोलानच्या इन्सेप्शन चित्रपटात हे गाणं वारंवार येतं. इतकंच काय पण संपूर्ण चित्रपटात हेच गाणं पार्श्वसंगीत म्हणून संथ लयीत वाजत रहातं. बॅटमॅन आणि जोकरमुळे नोलानचा फॅन बनलेल्या मला इन्सेप्शनमध्ये मात्र फसगत झाल्यासारखं वाटलं. अतिशय सुंदर बांधलेला हा चित्रपट जरी मला आवडला असला तरी यात प्रेक्षक कसा विचार करतील त्याची गणितं मांडून पटकथेची मांडणी केल्यासारखी मला वाटली होती. हे काही वाईट नाही.

कागदाचे झाड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

Making of photo and status : २. जावळ.

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 15/10/2017 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 छायाचीत्राचा खालचा भाग पहा बरं ! काय दिसतंय ? काळ्या कातळावर केसासारखं काहीतरी दिसतंय ना ? फसलात !