Skip to main content

कला

मराठी शुभेच्छापत्र स्पर्धा: रौप्यमहोत्सवी वर्ष

लेखक पारुबाई यांनी गुरुवार, 28/12/2017 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे. ‘ही दीपावली आपल्याला सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो’ मात्र त्या वेळेसही बाजारात इंग्रजी भाषेमध्ये बरीच वेगवेगळ्या प्रकारची ग्रीटींग्स उपलब्ध असायची.

गडद

लेखक समयांत यांनी शनिवार, 23/12/2017 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाला : निष्कारण एके ठिकाणी सुंदर फुले फुलवण्याची कला असते दूरवर निरंतर आवाजाचे निर्मम साज लावण्याची कला असते पसरलेल्या लाखो लाखो तारकांना दिशा देण्याची कला असते क्षणभर परिघापलीकडल्या काजव्यांना चमकवण्याची कला असते इतिहासातल्या पानांमध्ये संस्कृतींना गाडण्याची कला असते आपल्यासारखी त्याला मान्य-अमान्यतेची कसली सक्ती नसते

( काल रातीला सपान पडलं )

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 11/12/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

|| गुरु महिमा ||

लेखक गबाळ्या यांनी शुक्रवार, 08/12/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

नवा कवी

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 06/12/2017 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

'सिद्धार्थ' आणि शशी कपूर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 05/12/2017 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
'सिद्धार्थ' आणि शशी कपूर (आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. ) मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'. नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला. तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो....

Making of photo and status : ९. जाऊँ क्या खंडाला!?

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 03/12/2017 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 येऊ का आता? लगीन तर लागलंय, वाइच जाऊन येतो खंडाळ्यासनी.

कविराज

लेखक गबाळ्या यांनी रविवार, 03/12/2017 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! मी मिपाचा नवीन सदस्य. तुमच्यासाठी एक रचना घेऊन आलो आहे. तुमच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे. अगदी परखडपणे तुमच्या प्रतिक्रिया मांडा. मग त्या सकारात्मक असोत, नकारात्मक असोत, तटस्थ असोत वा सल्ले/उपदेश असोत. स्वयंसुधारणेसाठी मला त्याचा नक्कीच उपयोग होईल. ( कवीला व्यासपीठ मिळणं, श्रोते मिळणं, हि पर्वणीच आहे. आणि कोणा कवीला जर श्रोते स्वतःहुन म्हणत असतील कि आम्ही तुमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, तर ते त्या कवीचं अहोभाग्यच. असं भाग्य एका नवकवीच्या वाट्याला आलं. त्याची हि कविता.

Making of photo and status : ८. वाळूवरच्या रेघोट्या!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 26/11/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.