Skip to main content

कला

इंग्रजी मालिका - ब्रॉडचर्च

लेखक nishapari यांनी शनिवार, 20/04/2019 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रॉडचर्च ही मालिका पूर्ण पाहून झाली ... बरीच गंभीर होती .. पण काही हलकेफुलके सीन्सही होते .. 3 सिजन्स मध्ये 3 वेगळ्या केसेस होत्या . पहिल्या एपिसोड मधल्या खुनाच्या गुन्ह्याचा गुन्हेगार आठव्या एपिसोड मधे समजतो ... दुसरा सिजन पूर्ण त्याची कोर्टात केस आणि दुसरी एक सेपरेट इन्वेस्टीगेशन केस .. तिसरा सिजन एक वेगळी केस असं आहे ... आधी पाहिलेल्या सगळ्या सिरिअल्स पेक्षा वेगळी होती .. गुन्ह्यांचा खोलवर शोध हे तर वैशिष्ट्य आहेच पण ते क्राईमच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येईल कदाचित..... त्यात फार विशेष काही नाही ... अर्थात तेही गुंगवून ठेवणारं होतंच .

हिंदी चित्रपट गीतांचा संस्कृत भावानुवाद

लेखक धर्मराजमुटके यांनी सोमवार, 11/03/2019 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
युट्यबवर सहज फिरता फिरता संस्कृत रुपांतरीत केलेली काही गाणी आढळली. मला संस्कृत येत नसल्यामुळे ती गाणी अर्थाच्या दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने किती परीपुर्ण आहेत माहित नाही पण ऐकायला मात्र गोड वाटतात. गायकांचा आवाज देखील मस्त आहे. एकंदरीत वेगळा प्रयोग म्हणून बघायचे तर नक्कीच सुंदर प्रयत्न ! काही दुवे येथे देत आहे. उत्सुकांनी एकदा ऐकायला हरकत नाही. १. धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना २. मेरे रश्के कमर ३.

गेम ऑफ थ्रोन्स पार्श्वभूमी

लेखक nishapari यांनी बुधवार, 13/02/2019 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेम ऑफ थ्रोन्सच्या कथानकाची पार्श्वभूमी थोडक्यात - वेस्टेरोज या प्रचंड प्रदेशात सात प्रमुख घराणी व त्यांची 7 राज्यं आहेत . ती घराणी म्हणजे बरॅथिऑन , स्टार्क , लॅनिस्टर , टार्गेरियन्स , ग्रेजॉय आणि टली , टायरेल आणि सातवं मार्टेल . मालिकेची सुरुवात होते तेव्हा किंग रॉबर्टस राजा आहे आणि बाकीची सगळी राज्यं मांडलिक .. किंग रॉबर्ट्स हा वंशपरंपरागत राजा नाही .. त्याच्याआधी टार्गेरियन्स या घराण्याची सत्ता होती , पहिल्या एपिसोड मध्ये जे चंदेरी केसांचे भाऊ बहीण व्हिसेरिस व डॅनेरिस भेटतात त्यांच्या घराण्याची .

भाई...

लेखक हर्षद खुस्पे यांनी शनिवार, 12/01/2019 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज “भाई एक व्यक्ती कि वल्ली” हा चित्रपट पाहायला जायचा योग्य आला. खरे तर जरा साशंक मनानेच गेलो कारण शिव धनुष्य पेलणे जसे अवघड तसे आभाळाएवढी उंची असलेली व्यक्ती शब्दामध्ये अथवा कलाकृतीमध्ये बंदिस्त करणे अवघडच. चित्रपट पाहायला सुरवात केल्यानंतर मात्र उगाच आलो असे वाटायला लागली कारण काही आठवणी नकोश्या च वाटतात. आज एवढी वर्षे झाली पु. ल. आपल्यात नसण्याला पण अगदी काल-परवाची गोष्ट असल्यासारखी वाटते. नाही नाही मला सिनेमाचे परीक्षण लिहायचे नाही , तशी माझी कुवत ही नाही. परंतु पु. ल. च्याच हरितात्यासारखे काही व्यक्ती आपल्या बरोबर कायम आहेत अश्या वाटतात त्यापैकी एक पु. ल.

विलक्षण १.०

लेखक दीपक११७७ यांनी बुधवार, 09/01/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील अलबामा राज्यातील गॉंडस डेन शहरातील एका विद्यर्थ्याला त्याच्या मित्रांची खिल्ली उडवण्याची-टिंगल करण्याची इच्छा झाली. जसे कोकिळेला चिडवण्यासाठी तिच्या कुहू-कुहू नंतर आपण ही कुहू-कुहू करतो तसले. पण या मुलाची पद्धत एकदमच वेगळी होती, केवळ वेगळी नसून विलक्षण सुद्धा होती.

3 Idiots

लेखक वेडसर यांनी शुक्रवार, 28/12/2018 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी कुठेतरी 3 Idiots बद्दलचा एक लेख वाचला. आता तो धागा नेमका सापडत नाहीये. लेख फारसा पटला नाही. त्यात एका प्रतिक्रियेत out of the box जाऊन काही करावं, आपल्याला आवडेल तेच करावं किंवा करून पहावं अशा काहीशा आशयाची एक प्रतिक्रिया होती ती मात्र पटली. शिवाय त्यातल्या संवादातून चतूर एकटा यशस्वी आहे आणि बाकीचे फरहान वगैरे फेल आहेत हे जे चित्र रंगवलं आहे ते चुकीचं आहे.

श्री वसंत गावंड - घरा घरात पोहोचलेला कलाकार

लेखक जागु यांनी बुधवार, 26/12/2018 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
घाव सोसूनच एखादी कलाकृती जन्माला येते, घाव बसत असताना, चटके खात असतानाच ती सुबक होत असते. घडवणाराही योग्य असला की कलाकृती कशी सुबक सुंदर बनते व कलाकृती तयार झाली की ती जनमानसांत डोळ्यांत भरते, सुंदर दिसू लागते असेच काहीसे घडले गेलेले श्री वसंत लडग्या गावंड ह्या उरण - कुंभारवाडा येथील चित्रशिल्पकारा विषयी माहिती करून घेऊया. आपण रोजच्या व्यवहारात चलनी नाणी व नोटा पाहत असतो. नोटा व नाण्यांवरची चित्रशिल्पे आपले लक्ष वेधून घेत असतात.

पुलं "दैवत"

लेखक MipaPremiYogesh यांनी शुक्रवार, 23/11/2018 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की.

शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 07/11/2018 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद (१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत) मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७ १ महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः . तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे २ अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयोः अतद्व्यावृत्त्या यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि स कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न