Skip to main content

कला

फुलांची फुल स्टोरी...

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 13/10/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ येत आहे. दिवाळीमध्ये धन्वंतरी पुजनामध्ये खाली मंत्र म्हंणण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. श्रीमत भागवतामध्ये (३/१५/१९) मध्ये सदर श्लोक पहायवयास मिळतो. सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:| बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद यात अनेकविध फुले तसेच वनस्पती, वृक्षांचा उल्लेख येतो. व या व अशा प्रकारच्या फुलांच्या समर्पणाने जगदीश्वर प्रसन्न (प्रसन्न म्हणजे आनंदीत) होतो. अशा आशयाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ फुले समर्पण भाव जागा करु शकतात असा होतो. लहान मुलांच्या निरागस, निर्लोभ स्वभावाला अनेकदा आपण फुलांची उपमा देतो.

ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा

लेखक कौशिक लेले यांनी शुक्रवार, 13/10/2017 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
अमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते. मिपा लेख १ मिपा लेख २ त्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे. २ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- "क्रियापद रूपावली". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.

मधुघट१

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 10/10/2017 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
मधुघट कुणा मिळे भरलेला शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।। बळ कैसे येईल अंगा जळही दुर्मिळ भासतसे अमृताची जरी हाव नसे ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।। लोळे कुणी मखमालीवरी वणवण, हाय! कुणा ललाटी भलीबुरी, ही जगरहाटी! कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।। भला जाणता दीन नेणता कष्ट करी अमाप जरी जैसे तैसे रहावे धरी साखरपाणी तो प्यालेला ।।३।। - संदीप चांदणे

चंद्राचा पाढा

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/10/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार, चंद्र सक ओठावरचा तिळ, साता चंद्र हसू मधाळ निरीनिरीतुन लगबगणारी चंद्र आठा बोटे आठ खांद्यावरती पदर विसावे नव्वे चंद्र चोळीगाठ भांगेतिल कुंकू लावण्याने मुसमुसलेला चंद्रोदय गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका!

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 28/09/2017 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे. लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका! लता मंगेशकरला सर्वश्रेष्ठ गायिका मानणारे असंख्य लोक आहेत म्हणून मग लताला शिव्या घालणारे हि काही लोक आहेत. मी लताचा भयंकर चाहता असलो तरी अंध भक्त नाही. आणि लताची गाणी आवडतात म्हणजे इतर गायिकाकडे ढुंकूनहि पाहायचे नाही असले दळभद्री विचारसुद्धा माझ्या मनात येत नाहीत.बऱ्याचदा आपण चाहते लोक असाच सारासार विवेक हरवून बसतो आणि स्वतःची गोची करून घेतो असं मला वाटतं.

गवळीच्या चरणी कलात्मकता

लेखक डॅडीभाई यांनी मंगळवार, 19/09/2017 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
बेरोजगार असताना फुकटचा पैसा मिळविण्याची चटक लागली की पावलं गुन्हेगारीकडे वळू लागतात. अरुण गवळी त्याला अपवाद नाहीच. ज्या काळात मुंबई हाजी मस्तान आणि करीम लाला या तस्करांच्या नावाने ओळखली जायची, त्या दशकात म्हणजेच सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मुंबईत एक वेगळं गुन्हेगारी विश्व उभं राहात होतं. त्याला हळूहळू रक्ताची चटक लागत होती. स्मगलिंग पुरतं मर्यादित हे गुन्हेगारी विश्व विस्तारु लागलं आणि वर्चस्वासाठी लढाया सुरु झाल्या. त्या लढायांचं नाव होतं गँगवॉर. करीम लाला आणि हाजी मस्ताननंतर मुंबईचा डॉन कोण, तर दाऊद अशी स्थिती होती. या जगतावर त्याची पकड बसू लागली होती.

एक संध्याकाळ..

लेखक दिपक लोखंडे यांनी बुधवार, 06/09/2017 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा..

कंगना राणवतची मुलाखत आणि भारतीय स्त्रीवाद

लेखक नर्मदेतला गोटा यांनी मंगळवार, 05/09/2017 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या संपूर्ण देशामधे कंगना राणावतच्या मुलाखतीच्या निमित्ताने वादविवाद आणि चर्चा सुरू आहेत. स्पष्ट सांगायचं तर एखादी महिला पुढे येऊन आपल्या आयुष्यातल्या वादग्रस्त भागावर प्रकाश टाकते तेव्हा अनेक शौकिनांना चघळायला एक विषय मिळतो. पण शौकीन स्पष्टपणे ते कसे मान्य करणार.

मेंदुला दुखापत

लेखक रानरेडा यांनी सोमवार, 04/09/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मेंदुला दुखापत पाशवी गवत आहे पाशवी गवत आहे खेळ आणि डेझी चेन आणि हसणे स्मरण पथ्यावर ल्यूनी ठेवण्यासाठी आला पापी हॉलमध्ये आहे पार्सर्स माझ्या हॉलमध्ये आहेत या कागदाच्या चौकटीत चेहर्यावर जमिनीवर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक दिवशी पेपर बॉय अधिक आणतो आणि जर बांध काही वर्षांनी खुले होते आणि जर टेकडीवर काहीच जागा नसेल आणि जर आपले डोकेदेखील अंधाऱ्या विरहीत असतील तर मी तुम्हाला चंद्राच्या गडद बाजूला बघितो पागल माझ्या डोक्यात आहे पागल माझ्या डोक्यात आहे आपण ब्लेड लावा, आपण बदल करा मी पुन्हा विचार करेन 'जोपर्यंत मी समजणार नाही आपण दार लॉक आणि कळ टाकून द्या माझ्या डोक्यात कोणीतरी आहे पण मी नाही आहे जर मेघगर

आली गौराई अंगणी

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 30/08/2017 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या चतुर्थीपासून उभ्या महाराष्ट्रात वातावरण कसे गणेशमय झालाय ना, आता कालपासून त्यात भर पडलीय गौरींची. पण तुम्ही एक गोष्ट अनुभवलीत का? आपला लाडका बाप्पा महाराष्ट्रभर घरोघरी येत नसला तरी त्याचे लाड आणि साजशृंगार मगाराष्ट्राभर जवळ जवळ जवळ जवळ सारखेच केले जातात. पण माहेरवाशीण बनून येणारी गौरीचं तसं नाहीये, ती घरोघरी येते आणि तिचं कोडकौतुक मात्र वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तिचं स्वरूपही वेगवेगळं असतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आमच्या साध्या भोळ्या गौराईची ओळख करून द्यावी. तर आमच्या गौरीच्या आगमनाची तयारी श्रावण संपतानाच चालू केली जाते. सुरुवात होते घमेलंभर तांबडमातीपासून.