मित्रांनो..संक्रांतिला "तिळगुळ घ्या अन गोड बोला"असे म्हणत आपण आपल्या मित्र मैत्रीणिना तिळ्गुळ जरुर द्या पण वाचा आपल्या पुर्वजांच्या रण धुमाळिचि कहाणी...दोन अश्रु डोळ्यातुन बाहेर पडुन त्यांना आदरांजली देवु यात..व त्यांचे स्मरण करु यात....
आज संक्रांत.
संदर्भ - पानिपत -लेखक श्री. विश्वास पाटिल.
आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला.