जय जय भारत ! जय जय भारत !
धवलगिरीच्या हिमशिखरांतुन सह्याद्रीच्या उंच कड्यांतुन
गंगा-यमुना-गोदावरीच्या शुभ्र स्फटिकसम शीत जलातुन
घोष एक हा घुमू लागला जय जय भारत ! जय जय भारत !
भेदातीत गर्जना होतसे जय जय भारत ! जय जय भारत !
सूप्त अग्नि तो फुलून उठला क्रांतीच्या कुंडात प्रकटला
पाश तोडण्या परदास्याचा तृतिय नेत्र शंकरे उघडिला
पितृभूमी ही मुक्त कराया सुपुत्र रणसागर हा आला
कोटिकंठरव कानी येई जय जय भारत ! जय जय भारत !
स्वप्राणांच्या असंख्य ज्योती स्वयें अर्पिल्या या देशाप्रति
निर्भय योद्धे रणात पडले देउनि निज प्राणांच्या आहुति
क्रांतिवीर ते अमर जाहले विसरुनि घर अन् विसरुनि नाती
तख़्तावरही गर्जुन गेले जय जय भारत ! जय जय भारत
आज कुठे ते सुतत्व जावे? का स्वार्थी तांडव चालावे?
फुकाच आम्ही आज कशाला स्वतंत्र आम्हा म्हणवुनि घ्यावे?
उठा बंधु हो ! करा प्रतिज्ञा, स्वराज्य माझे सुराज्य व्हावे !
एक मंत्र हा चला जपूया जय जय भारत ! जय जय भारत !
वाचने
1669
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
सुरेख
फारच छान!
In reply to फारच छान! by विकास
कविता
मस्तच..