मनाच्या कुपीतले-समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
नमस्कार मित्रानो,
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दुसरा लेख.....
(सुचना- या लेखात जेथे जेथे इश्वरवाद हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी नास्तिकानी निसर्गवाद हा शब्द वाचावा कारण तो मुद्दा फक्त त्याच द्रुष्टीने घेतला असुन त्याचा कोणत्याही धार्मीक भावनेशी काडीमात्र संबंध नाही.)
समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
आज एकूणच मानवजात, समाज एका विशिष्ठ परिस्थितीस येऊन पोहोचला आहे. आज, समाजाला निर्णय घ्यायची गरज आहे. गेली 10-15 वर्षे, विशेषत: गेली 3-4 वर्षे समाज विविध विचारप्रवाहांमध्ये अडकलेला आहे. मात्र गेल्या 3 महिन्यात निर्माण झालेल्या स्थितीमुळे तर घोडा मैदान जवळ अगदी तोंडावर येऊन ठेपले आहे. पण असं घडलंय तरी काय ? की त्यामुळे मी असं कांही लिहितोय ,एवढं काय घडलंय तरी काय असं जगात ? अजुनही लोक छानचौकीत जगतायत. कोणती युध्दे गेल्या 3 वर्षात झालेली नाहीत. जग प्रगतीपथावर आहे. मग असं काय बिघडलंय ?
वरवर पाहता जग नीट चालू आहे. सर्व ठिकाणी प्रगती चालू आहे. पण लक्षात घ्या, हा वरवरचा गिलावा आहे. आत कांहीतरी वेगळं घडतंय, जे कदाचित सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित नाही. पण, कधी ना कधी हा गिलावा उडून जाणार आहे. पण, मग प्रश्न काय आहे ?
गेल्या 200 वर्षात औद्योगिक क्रांतीनंतर विश्व दोन तत्वावर चालत आहे. पहिला समाजवाद आणि दुसरा भांडवलवाद. समाजाचा गाडा या दोन तत्वांवर नीटपणे चालू होता.
व्यक्तीपेक्षा समाज महत्वाचा या तत्वाच्या आधारे समाजवाद निर्माण झाला. रशियात उगम झालेल्या या वादाने थोडया कालावधीत बरेच जग काबील केले. कामगारांचे हित हे या धोरणाचे उद्दिष्ट होते. पहिल्या 20 वर्षात त्याचे चांगले परिणामही घडून आले. रशिया महासत्ता म्हणून उदयास आली. पण, हळूहळू या तत्वातील दुष्परिणाम जगापुढे आले. या तत्वात एक मुलभूत दोष होता. हे तत्व मनुष्यापेक्षा समाज मोठा या तत्वावर चालते. येथे मनुष्याच्या गरजांना, सुखसोयींना दुय्यम प्राधान्य दिले गेले तरी तो माणूस आहे. आणि माणसाला स्वार्थ असतोच की ? तो तो कितीवेळ दाबून ठेवणार. यातूनच, समाजवाद पोकळ होत गेला. आणि, 1990 मध्ये रशियाच्या विघटनाने साम्यवाद संपुष्टात आला. भारत, चीन सारख्या देशात तो कांही प्रमाणात अजूनही आहे. पण, 2 महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ समाजवादी नेत्याने समाजवादाचा पराभव झाला असे खुलेआम मान्य केले . आता याला काय म्हणायचे ?
हे जग चालवणारा दुसरा वाद भांडवालवाद. याची व्याप्ती ही समाजवादाच्या कैकपटीने मोठी. भांडवलवादाचे मुख्य सुत्र मी(व्यक्ती). हा भांडवलवाद या "मी" भोवती सतत फिरत राहतो. मी, माझे नातलग माझे कुटुंब, माझा पैसा, माझ्या सुखसोयी. सगळं माझं ! हा विचार व्यक्तीकेंद्रीत आहे. त्यामुळे साहजिकच येथे फक्त स्वत:च्याच फायद्याचा विचार केला जातो. बाकी जग गेलं उडतं. माझा फायदा म्हणजे सगळं. हा वाद मानवी मनास पुरक होता. त्यामुळे तो प्रचंड वाढला. यशस्वी ठरला. अनेक मोठमोठया कंपन्या, अब्जाधीश, ही त्याचीच उदाहरणे. क्वचित भांडवलवाद, चंगळवादात रूपांतरीत झाला. त्यातून मग व्यसने, मौजमला वगैरे आली आणि बरेच कांही. पण गेल्या दोन महिन्यात भांडवालवाद कोसळला. हे विधान अतिशयोक्ती असेल. पण माझे स्पष्ट मत आहे कीं, भांडवलवाद कोसळला. पत्त्याच्या डोंगराप्रमाणे कोसळला. पडणारे शेअरबाजार, कोसळणाऱ्या बँका, डबघाईला आलेले उद्योग, वाढते दर आणि विशेष म्हणजे माणसांची खचलेली मनोवृत्ती. सारं कांही याचंच द्योतक आहे असं मला वाटतं. पण असं का घडावं ? मीच म्हणालो ना, की हा वाद मानवी प्रवृत्तीस अनुकूल होता. मग असं का ? माणसाची खरी गल्लत इथेच झाली. सुखाचे दार उघडल्यावर तो आपसुक त्यात ओढला गेला आणि एखाद्या घोडयाप्रमाणे आजूबाजूचा समाज, त्याला दिसेनासा झाला. इतकेच काय, तर घोडयाप्रमाणे सरळ जात असल्याने तो आपले अंथरूण विसरला. कुवत विसरला. यु.एस.ए. तील गृहउद्योग, गृहकर्जे हे त्याचेच ज्वलंत उदाहरण ती सरळ जात होता. पण, आजुबाजूला पडणारा अंधार त्याला दिसत नव्हता. स्वत:च्याच युगात वावरणारी तरूणाई हे त्याचेच उदाहरण विविध उद्योगात आलेली बूम हे त्या घसरणाऱ्या पायास अधिक पोषक ठरली. तत्वनाश झाला. पण जेंव्हा तो अंधार त्या वाटेवरही पसरला तेंव्हा तो झटकन् कोसळला. कारण जगात दु:ख असतं, हे तो विसरला होता. ते सोसायची ताकद त्याने कधीच गमावतो होती. कायमची .............
पण, मग आता काय करायचं ? जगरहाटी चालवायला कोणती तरी विचारधारा हवीच ना ? मग कुठे आहे ती विचारधारा ? आता विचार कसा करायचा ? या सर्व प्रश्नांवर उत्तर आहे, ईश्वरवाद अहं ! हा कुठला नवीन वाद नाही. आपण भारतीय तर तो पूर्वीपासून वापरतोय हा ! आणि यात कर्मकांड तर अजिबात सांगितलेली नाहीत. फक्त लोक वाचतील म्हणून हे नांव दिलंय म्हणा आपण याला निसर्गवाद असेही म्हणु शकता हवं तर ! फक्त काय झालं, या वादावर इतर दोन वादांनी गारूड केलं. आपणही ते निमूटपणे ऐकलं, जग म्हणतंय म्हणून, थर्ड वर्ड म्हणून घेतलं. आणि फर्स्ट वर्ड होण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. पण, मग काय आहे हा वादात. कोणत्या तत्वावर हा उभा होता किंवा आता तग धरेल ? तर याची तत्वे आहेत मी आणि समाज माणसाला स्वत:चं कल्याण करायचं आहे हे त्रिवार सत्य आहे आणि, ती समाजप्रिय आहे. त्यामुळे समाजाचे कल्याण हे त्याचे कर्तव्य आहे. समाजवाद फक्त समाजहीत जाणत होता. तर, भांडवलवाद स्वहीत. पण, या दोहोंचा सुवर्णमध्य साधतो तो ईश्वरवाद. आज लोक म्हणतात कीं, ईश्वरच नाही आहे, मग हा ईश्वरवाद कसला? पण ईश्वर असणे आणि नसणे हा हा श्रध्देचा भाग आहे. पण, कदाचित कधी तरी हा वाद वापरणाऱ्यांनी समाजासाठी म्हणून किंवा मानव मोकाट होऊ नये म्हणून किंवा तो पूर्णपणे स्वनियंत्रित होऊ नये म्हणून वापरलेली संकल्पना म्हणजे ईश्वर असे मला वाटते. तर आता त्या संकल्पनांसंबंधी तर हा वाद सांगतो मी आणि समाज. एक, मी स्वत: आहे. मला मानवजन्म लाभला आहे, हा जन्म नक्कीच इतरांहून वेगळा आहे. म्हणून मला माझे कल्याण करायचे आहे ते झाले नाही. तर त्या मानवाचे जीवन निरर्थकच. पण, माझा जन्म फक्त माझ्यासाठी नाही. कळत-नकळतपणे आपल्या प्रगतीत अनेक जणांचा हातभार लागतो. मग झोपेतून दररोज जागी करणारी अज्ञात शकतो. असो, वा कधीतरी पाण्याचा लोटा देणारा अनोळखी मार्गस्थ ...... आणि या सगळयांचे आपल्यावर उपकार आहेत. उपकाराची जाणीव तर पशुपक्षीही ठेवतात. मग, आपण का ठेवायची नाही. म्हणूनच येथे येतो तो समाजाचा विचार. प्रत्येकाने समाजकल्याणाचा विचार करायचाच. पण, समाजकल्याण करताना स्वत:ला विसरायचे नाही, हेच सांगतो ईश्वरवाद ! मानवाकडे विचार करायची ताकद आहे. हे वेगळेपण त्याला मिळालंय म्हणूनच त्याचं आयुष्य वेगळं आहे. पशु भोगवादी असतो. पण, मानवाचं आयुष्य भोग आणि त्याग यांचा मिलाफ आहे. बरं ! एवढं सगळं बोलतात. पण याला प्रमाण ? आहे ना ! समाजवादाचा जाहीरनामा होता. भांडवलवादावर तर अनेक पुस्तके आहेत. तसेच, ईश्वरवादालाही प्रमाण आहे. देव, त्याचे अस्तित्व यांवर तुमचा विश्वास असो वा नसो. पण, कांही भारतीय वाङमय हे लिखित स्वरूपात आहे आणि लिखित आहे, याचा अर्थ त्याला अस्तित्व आहे. आपण ते देवाने नव्हे तर मानवाने लिहिले आहे असे समजू. पण इतर वादही मानवनिर्मित आहे. त्यामुळे, यांवर वाद होण्याचे कारण नाही. मी स्वत: वेद वाचलेले नाहीत. मी त्याचा अभ्यासकही नाही. पण, मला मिळालेल्या लेखातून जे मान्यताप्राप्त आहेत. एवढे स्पष्ट होते कीं, ईश्वरवाद वैदिक वाङमयात स्पष्ट केला आहे. तो कडक शब्दात आहे. पण, त्याचे सामान्यीकरण भगवद्गीतेत करण्यात आलेले आहे.
या ईश्वरवादास अजून एक पुष्टी मिळते. समाजवाद, भांडवलवादावर जग 200 वर्षे चालले. मात्र ईश्वरवादावर जग जवळ-जवळ 1000 वर्षे वा त्यापेक्षा जास्त गुण्यागोविंदाने चाललेले आहे. पण, मग प्रश्न उपस्थित होतो की, त्यानंतर तो वाद का कोसळला ? याला उत्तर असे कीं, त्यावेळी परकीय व्यक्ती, राजकारणी आणि विचारप्रवाह या देशात आले. त्यांच्याशी या वादाला समरस होता आले नाही. आणि, इतरांनी आपल्या शक्तीच्या जोरावर त्यांवर मात केली. पण ती त्या वादाचा पराजय नव्हता. ती परिस्थिती होती. या वादातही त्रुटी आहेतच. हा वादमध्ये वाहवत गेला. कर्मकांडाचे स्तोम माजले. वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेत अवनत झाली. पण, या सर्वांचा इतका भयंकर परिणाम झाला नाही कीं, जगायचे कसे ? हा प्रश्न पडावा आणि झाला असेल तर, तो भरून काढण्यात आला. एखादी चुक दुरूस्त करायची व्यवस्था बहुधा याच वादात असावी. आणि म्हणूनच 2000 वर्षानंतर देखील भोग, त्यागाचा मिलाफ सांगणारे विवेकानंद जन्माला येतात.
हा ईश्वरवाद सांगुन तर झाला. पण या वादानुसार जगायचे कसे ? तसे म्हटले, तर याचे अनुकरण प्रत्येकाला आपापल्यापरीने करणे शक्य आहे. त्यासाठी काळ, वेळ, पंथ, सुबत्ता, पत याची गरज नाही. हजारो माणसांमुळे समाज निर्माण होतो आणि आपण समाजाचे घटक आहोत ही गोष्ट जर प्रत्येकाने ध्यानात ठेवली आणि आपली वर्तणूक समाजास हानीकारक होणार नाही याची काळजी घेतली व फावल्या वेळात ध्येय व मनोरंजन याचे संतुलन साधून कांही वेळ समाजकार्यास दिल्यास नक्कीच ईश्वरवाद साधता येईल. मग, त्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्याचा उहापोह करण्याचे हे साधन नाही. तसा ह्या लेखाचा उद्देशही नाही. येथे, फक्त ईश्वरवाद या संकल्पनेचा उहापोह करण्यात आलेला आहे.
तर असा हा ईश्वरवाद, निसर्गवाद म्हणा हवं तर ! मानव प्रयोगशील आहे. तर मग या वादाचा प्रयोग करायला काय हरकत आहे. मुळात म्हणजे हे हवेत सोडलेले बाण नव्हेत. याला तात्विक अधिष्ठान आहे. हजार वर्षांची परंपरा आहे. मग, करायचा का प्रयत्न हा वाद वापरायचा. फायदा झाला तर चांगलंच. आणि तोटाही फारसा नाही. नाही तरी स्वत:च्या आवाजाला मुरड घालून आपण जे जगतोय. त्यातून फार कांही आनंददायक घडतंय अशातला भाग नाही. मग काय, बघूया ना हा प्रयत्न करून ?
मी कोणताही तत्वचिंतक, विचारवंत, वा कोणाचाही समर्थक नाही. मी फक्त 16 वर्षांचा असल्याने माझे अनुभव फार तोडके आहेत. नाहीतच ! त्यामुळे, सामाजिक परिस्थिती, विविध लेख आणि आत्मचिंतन यांच्या आधारावर हा लेख लिहिलेला आहे. हा लेख लिहिताना तटस्थता बाळगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असून, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्याबद्दल क्षमस्व ! या लेखातून कोणतीही भावना रूजवायचा, फुलवायचा प्रयत्न केलेला नाही. येथे फक्त एक पर्याय सुचवलेला आहे. त्यांवर विचार करणे, वापरणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. हे विचारमंथन आहे. जे फायदेदायी आहे. त्यामुळे मी आपल्या विचारांचे, प्रतिक्रियांची वाट पाहतोय. माझ्यादृष्टीने त्या फार महत्वाच्या आहेत. तर नक्की, प्रतिक्रिया द्या. प्रतिक्रियांची वाट बघतोय. आता लहान तोंडी एवढा मोठा घास घेतल्यावर एवढंच म्हणीन. की बाबानो समजुन घ्या या मुर्खाला.......
धन्यवाद !
विनायक वा. पाचलग,
vinayakpachalag@gmail.com
www.vinayakpachalag.blogspot.com
www.marathilegends.tk
अवांतर- याच दीवशी गेल्या आठवड्यात मी "छानसे वाचलेले "या संकेत्स्थळाबद्दल माहिती दीली होती.गेल्या आठवड्यात त्याला खुप चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार ,
अशीच कृपा राहुदे हीच इश्वरचरणी प्रार्थना.
वाचने
6258
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
इश्वर वाद
In reply to इश्वर वाद by अविनाशकुलकर्णी
अवदंबर
In reply to अवदंबर by विनायक पाचलग
आई शप्पथ ...
आपण इश्वर
.
नमस्कार, नि
In reply to नमस्कार, नि by लिखाळ
होय
In reply to होय by विनायक पाचलग
मी आपल्या
प्रयत्न केला पण समजला नाही
In reply to प्रयत्न केला पण समजला नाही by धनंजय
सहमत
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
In reply to सहमत by अवलिया
२
ह्म्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
लेख दिशाहीन
In reply to लेख दिशाहीन by विसुनाना
राग नाही
विनायका
In reply to विनायका by वेताळ
आभार
शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न
In reply to शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न by गोगोल
अगदी बरोबर
In reply to शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न by गोगोल
गोगोल