मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

केदार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते खचो लागली तेवि मते कुराणेही खंडली रामराणी भद्रकाली रणरंगी कृद्ध झाली प्रलायाची वेळ आली मुगलहो सांभाळा " कवी गोविंद मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे.

सावरकर आणि आपण

ए. प्रशांत ·
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.

पूर्वेच्या देवा तुझे 'सूर्य'देव नाव

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
क्रांतिचे महात्म्य हेच की क्रांतिने रोमांचित झालेला एखादा सामान्य मनुष्य आपल्या ध्येयाने वेडा होऊन असा एखादा बेहोष क्षण जगतो की त्याचे सामान्यत्व त्याच्या नकळत गळुन पडते आणि त्याच्या तेजाने आसमंत दिपुन जातो. आपण कोण, आपले सामर्थ्य किती, आपली झेप कुठवर, आपला शत्रु किती प्रबळ, आपले ध्येय किती असाध्य याच यत्किंचितही विचार न करता ’मला माझ्या ध्येयाखातर काहीही दिव्य करावे लागले तरी मी ते साध्य करणारच’ हा ध्यास जे घेतात तेच लौकिकार्थाने अमर होतात.

जय जय भारत ! जय जय भारत !

आचरट कार्टा ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
धवलगिरीच्या हिमशिखरांतुन सह्याद्रीच्या उंच कड्यांतुन गंगा-यमुना-गोदावरीच्या शुभ्र स्फटिकसम शीत जलातुन घोष एक हा घुमू लागला जय जय भारत ! जय जय भारत ! भेदातीत गर्जना होतसे जय जय भारत ! जय जय भारत ! सूप्त अग्नि तो फुलून उठला क्रांतीच्या कुंडात प्रकटला पाश तोडण्या परदास्याचा तृतिय नेत्र शंकरे उघडिला पितृभूमी ही मुक्त कराया सुपुत्र रणसागर हा आला कोटिकंठरव कानी येई जय जय भारत ! जय जय भारत ! स्वप्राणांच्या असंख्य ज्योती स्वयें अर्पिल्या या देशाप्रति निर्भय योद्धे रणात पडले देउनि निज प्राणांच्या आहुति क्रांतिवीर ते अमर जाहले विसरुनि घर अन्‌ विसरुनि नाती तख़्तावरही गर्जुन गेले जय जय भारत !

नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व

चिन्या१९८५ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा." नेताजी सुभाषचंद्र बोस काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती .

आज संक्रांत.

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
मित्रांनो..संक्रांतिला "तिळगुळ घ्या अन गोड बोला"असे म्हणत आपण आपल्या मित्र मैत्रीणिना तिळ्गुळ जरुर द्या पण वाचा आपल्या पुर्वजांच्या रण धुमाळिचि कहाणी...दोन अश्रु डोळ्यातुन बाहेर पडुन त्यांना आदरांजली देवु यात..व त्यांचे स्मरण करु यात.... आज संक्रांत. संदर्भ - पानिपत -लेखक श्री. विश्वास पाटिल. आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला.

नेहरूंवर लेखन करावे का? प्रस्ताव.

नितिन थत्ते ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपावर अनेक लेखकांनी गांधी (महात्मा) या विषयावर विपुल लेखन केले आहे. स्वतंत्र भारताच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणर्या नेहरूंवरही लिखान करण्याची शिफारस करतो. कोणी लिहिले नाही तर मी लिहिन

मनाच्या कुपीतले-समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?

विनायक पाचलग ·
लेखनप्रकार
नमस्कार मित्रानो, मनाच्या कुपीतले या सदरातला हा दुसरा लेख..... (सुचना- या लेखात जेथे जेथे इश्वरवाद हा शब्द आलेला आहे त्या ठिकाणी नास्तिकानी निसर्गवाद हा शब्द वाचावा कारण तो मुद्दा फक्त त्याच द्रुष्टीने घेतला असुन त्याचा कोणत्याही धार्मीक भावनेशी काडीमात्र संबंध नाही.)
समाजवाद, भांडवलवाद का ईश्वरवाद ?
आज एकूणच मानवजात, समाज एका विशिष्ठ परिस्थितीस येऊन पोहोचला आहे. आज, समाजाला निर्णय घ्यायची गरज आहे. गेली 10-15 वर्षे, विशेषत: गेली 3-4 वर्षे समाज विविध विचारप्रवाहांमध्ये अडकलेला आहे.

गांधीजींची अहिंसा-उपयुक्तता आणि मर्यादा

चिन्या१९८५ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
There are many causes that I am prepared to die for but no causes that I am prepared to kill for." महात्मा गांधी" केदार जोशीनी अहींसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला त्यानंतर गांधीजींची अहिंसा म्हणजे काय याचा मी शोध घेतला.गांधीजी म्हणतात की त्यांना एकच मार्ग माहीत आहे आणि तो म्हणजे अहिंसेचा(passive resistance).गांधीजींनी अहिंसेची प्रेरणा कस्तुरबा गांधींकडुन घेतलेली होती.गांधीजींची एखादी गोष्ट कस्तुरबांना पटत नसली तर त्या गांधीजींनी दिलेल्या त्रासाला सहन करत पण विरोधही करत.यातुन गांधीजींचे मन बदलले आणि बायकोवर हुकुम चालव

जाहीर विचारणा आणि आवाहन

घाटावरचे भट ·
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.