मिपा वर गझल वर बरच काही वाचायला मिळाले... मनात आल, आपल्याला माहीती असलेल बा़कीच्याना ऐकवाव. नाहीतरी समर्थ सान्गुन गेले आहेत ..जे जे आपणासी ठावे, ते ते दुसर्याशी सान्गावे, शहाणे करुन सोडावे - सकल जन...
तर... असो!...
आता जरा ह्या शेराकडे लक्श द्या.
' तोच रस्ता त्याच वाटा, चालतो आहे नव्याने ..
तीच दु:खे, त्याच जखमा सोसतो आहे नव्याने'
.....कसा आहे?
अजुन एक पहा....
' रस्ता असा मिळाला कोठेच झाड नव्हते,
माझ्याच सावलीवर आता विसावतो मी'
अथवा...
...."त्या च भिन्ती, तीच दारे-फक्त नाही आत कोणी .
आज मी माझ्या घराला पाहतो आहे नव्याने...'
जबरदस्त आहे ना?
....लोकहो, गैरसमज नको...