Skip to main content

खंत.....

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/12/2009 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
२६-११-२००८ नंतर त्यावेळचे गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला , आणि आज १ वर्षानी परत तेच गृहमंत्री आहेत ! निर्लज्जपणाचा यापेक्षा दुसरा दाखला कुठे असेल? आणि हेच दिलासा देणार की अशोक कामते यांच्या बाबत चौकशी केली जाईल..... या परिस्थितीचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न..... खंत..... आसवांचे केव्हढे उपकार झाले , मारेकरी कणवेस साक्षीदार झाले ! ( करकरे , कामते , साळसकर , उन्नीकृष्णन्....सारे शहीद झाले , आणि "कसाब" मात्र कणवेस पात्र ठरला !) जाधवांचे दु:ख जाणावे कसे? साथ ते सोडून .....दावेदार झाले ! ( जाधवांच्या डोळ्यासमोर , त्यांच्या ३ साथीदारांना निर्घृणरित्या मारण्यात आले , आण
काव्यरस

सखये तुझ्या मिठीत.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 18/11/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , नुरलो जरा न माझा मग एकटाच होतो , माणसांच्या या दाटीत ! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतीस न्हायलेली ते रूप कोंडले मी , पापण्यांतल्या फटीत ! अन्दाज यौवनाचा आला तुला न केंव्हा सगळे तुझ्यात होते , उजवे किती पटीत ! झंकारलो असा मी , हुंकार तुझा घेण्याला होकार लाजलेला , कुठल्या सुरावटीत ? जगणे कधीच गेले , माझे तुझ्या मुठीत .....जगणे कधीच गेले , माझे तुझ्या मुठीत ; मरणे जमेल का गं , सखये तुझ्या मिठीत?सखये तुझ्या मिठीत?
काव्यरस

नकोसे वाटते

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 14/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते? कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे" मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते? सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!" सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी? संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

मृगजळ

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 05/11/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू नाहीस, की जसा पाउसही नाही चातकास मेघाचे दर्शनही नाही हुडकत होतो प्रेमाचा झरा मी नशीबास मंजुर मृगजळही नाही वेड्या मनास साथ असे सुरांची रडण्यास खांदा जवळ एकही नाही आस तुझी अजुनही स्वप्नांस आहे असुनी समोर, डोळ्यांस भासतही नाही मिळता न तु सांग काय करेन मी? "तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही" काव्य 'रिफाईन' प्रोसेसमधे मदतीबद्दल विशेष आभारः श्रामो आणी नाना
काव्यरस

तू पुन्हा

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 27/10/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंती लाघवी गंध जेव्हा लाजले मोगर्‍याने गे तुझे, नाव तेव्हा घेतले पैंजणांच्या किलबिली, पाखरे नादावली थिरकता तव पावले, सूर साती छेडले मोकळ्या ओल्या बटा, फिरविता वार्‍यावरी थेंब ते सारे झणी, चातकाने झेलले भास्कराने पाहता, वळविला तू चेहरा अन नभीचे मेघ ते, पश्चिमी झेपावले गौर अंगाला तुझ्या, चुंबणारे ऊनही ती झळाळी कांचनी, लेवुनी सरसावले स्मित गाली विलसता, दशदिशा आसावल्या हात अपुले गुंतुनी, जगपरिघ आकुंचले शब्द ही ना बोलल्या, पाकळ्या अधरातल्या श्वास माझा तोलती, अर्थ ते नजरेतले
काव्यरस

बहुधा

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 22/10/2009 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे, भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती, वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे ! त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले, या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे येता जाता श्रावण येथे थांबत होता, त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे ! कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले, त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे ! पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे, इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 20/10/2009 05:20 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले!
काव्यरस

'उ'कारावर चंद्रानुस्वार कसा काढायचा?

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 18/10/2009 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना. म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे बर्‍याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले.

भैरवी

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 06/10/2009 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक पाश तोड, गुंतण्याची वेळ नाही परतीचा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही विसर ते हेवेदावे, घाल अपराध पोटी, कोण कसे चुकले हे सांगण्याची वेळ नाही तुझे नसलेले सारे गुन्हे इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी बाजू मांडण्याची वेळ नाही संकटांनी आयुष्याशी उभे दावे मांडलेले, रात्र ही वै-याची आहे, पेंगण्याची वेळ नाही पैलतीर दिसे आता, आवरून घे सुरांना, भैरवीवाचून काही रंगण्याची वेळ नाही
काव्यरस

हास आयुष्या

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 29/09/2009 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुरांनी मांडली दारी तुझ्या आरास आयुष्या अरे, आता तरी सोडून चिंता हास आयुष्या ! कधी काट्यापरी सलणे, कधी गंधाळणे, फुलणे दिले तू वेदनेला चांदण्यांचे श्वास आयुष्या ! तुला माझी, मला त्याची सदा हुलकावणी चाले, जिवाचा खेळखंडोबा पुन्हा केलास आयुष्या जिथे होते तुझे घरटे, अता ती मोडली फांदी तसे माझे तरी उरले कितीसे श्वास आयुष्या ? कधी जन्मांतरीचे आपले नाते खरे होते ? कधी होतास तू माझ्याचसाठी ख़ास आयुष्या ? दिवे मंदावता येशील माझ्या सोबतीसाठी मला तू एवढा देशील का विश्वास आयुष्या ?