Skip to main content

(केवढे चावणे हे गजल दरगजल)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 06/04/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली जालावर वावरताना असं लक्षात येतं की गजलांचा आणि शायरांचा सुकाळ झालाय! अरे काय असतात एकेक गजला! आजच एक 'गजल' मला चावली आणि मग कळवळलोच.... केवढे चावणे हे गजल दरगजल... काय जाणे कुणी मारली ही मजल! मी कितीदातरी नाडि ओढायचो अन तुमानीमधे व्हायचे मग बदल काय दुर्भिक्ष हे कल्पना आटल्या... का अशी देत आहेस घंटी डबल? जाम हैराण मी जाहलो याइथे जो उठे तो म्हणे मी नवाबे गझल फासतो आज कोणी ... उद्या वेगळा का 'मनोगत' विकल 'मायबोली' विकल? आज सैलावल्यासारखे वाटते पापडांच्यामधे एक चपटी तरल मेंढरासारखी मेंबरे कावली हाण तू, हाण तू, हाण 'रंगा' बुकल चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2492
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

केवळ उत्तम! हहपुवा =)) मी कितीदातरी नाडि ओढायचो अन तुमानीमधे व्हायचे मग बदल काय दुर्भिक्ष हे कल्पना आटल्या... का अशी देत आहेस घंटी डबल? जाम हैराण मी जाहलो याइथे जो उठे तो म्हणे मी नवाबे गझल मेंढरासारखी मेंबरे कावली हाण तू, हाण तू, हाण 'रंगा' बुकल वोsssss येकाच बारात किती अन् कुनाकुनाला हानाल! जातं लय जोरात फिरलंया!! :) तुम्ही अशक्य आहात रंगाशेठ! सलाम! _/\_ राघव

रंगाशेठ, केवढे चावणे हे गजल दरगजल.. हा हा हा.. चालू दे.. बुकलंण.. (गजली)केशवसुमार

'गजल दरगजल' मध्येच सगळा थकवा, गाळलेला घाम, आणि या सगळ्याला अंत कधी? ही भावना आली...मस्त... बाकी मायबोली मनोगतचे संदर्भ नसल्यामुळे काही कडवी पूर्णपणे भिडली नाही... असो, हळुहळू शिकायला मिळेल.. राजेश

वा उस्ताद वा !! *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/