मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

तू ठरव...

सत्यजित... ·
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

हसण्या उसंत नाही

कौस्तुभ भोसले ·
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त

पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)

कौस्तुभ भोसले ·
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद

आत्मनिर्भर

कुमार जावडेकर ·
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले... अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी... दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले चालणे नशिबात होते का म्हणू मी... राहण्यासाठी कुठे घर होत गेले? प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे मौनही माझे निरुत्तर होत गेले - कुमार जावडेकर

काहीतरी आणि गझल

अजिंक्यराव पाटील ·
"तसं मी आधीच क्लिअर केलं होतं तुला, तरीही तुला का अशी भीती वाटतेय? मला तुझ्या past बद्दल काहीही हरकत नव्हती तेव्हा सुद्धा, आणि आजही नाहीये.. रावी मी तुला तुझा present मागितला होता, आणि future आपलं सोबतच राहिलं असतं याची खात्री होती.. "मग का घेतलेला तू तो gap?" "कारण तू लहान होतीस, तुझं शिकायचं वय.. मला वाटलेलं तू कमिट केलंय एकदा तर काय पुन्हा पुन्हा insecure feel करत राहायचं. विश्वास होता माझा, स्वतःवर आणि तुझ्यावर" "इथंच चुकलं तुझं, तू गृहीत धरलं मला, मला हवं होतं प्रेम..

दिल की बाते

अनाहूत ·
खुद को आईने में देखकर जरूर इतराना जिनके हम जैसे दिवाने होते है उनका खुदपर गुरूर करना लाजमी है और हाँ खुबसुरत तो तुम हो ही पर आज तो रोजसे ज़ादा हसीन दिख रही हो क्या करू प्यार ही इतना है के तुझे देखे बिना तेरा चेहरा पढ लेता हूँ इसका मतलब ये ना समझ लेना की तुझे देखे बिना ही खुश हूँ मेरी तो हर सुबह तेरा चेहरा देख कर ही शुरू होती है और तेरा चेहरा देख कर ही सो पाते है हम चैन से मेरा प्यार है तू हमेशा मुस्कुराती रहना तेरा मुस्कुराता चेहरा जीने की वजह है मेरी कभी तेरे चेहरे पे मायूसी ना आने देना मेरी जीने की वजह को मिटने ना देना हा तुझे गुस्सा देता रहूँगा बार बार क्या करू ऐसे ही बहुत हसीन हो पर

Whatsapp Romantic Shayari

तृप्ति २३ ·
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari

तू मेरे रुबरु है

महासंग्राम ·
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

गंगाधर मुटे ·
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

गझल : पुन्हा एकदा...

bhagwatblog ·
मा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा स्वप्नांची लचके तोडली मी स्वत: पराभवाने दिली मात पुन्हा एकदा कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा सुखांना जिंकण्याचा भास मला झाला दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा