गझल : पुन्हा एकदा...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग
संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा
शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत
निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा
स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:
पराभवाने दिली मात पुन्हा एकदा
कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण
अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा
प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च
नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा
सुखांना जिंकण्याचा भास मला झाला
दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा
काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ
संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा
वाचने
5662
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान !
In reply to छान ! by चौथा कोनाडा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by bhagwatblog
"स्वप्नांची लचके" असे
In reply to "स्वप्नांची लचके" असे by चौथा कोनाडा
असो
कल्पना ठीक आहेत. पण माफ करा
In reply to कल्पना ठीक आहेत. पण माफ करा by राघव
राघव,? कृपया एखादे उदाहरण
In reply to राघव,? कृपया एखादे उदाहरण by bhagwatblog
कल्पना ठीक आहेत. पण माफ करा
प्रतिसादा साठी धन्यवाद चौथा
सुखांना जिंकण्याचा भास मला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant