मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आत्मनिर्भर

कुमार जावडेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले... अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी... दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले चालणे नशिबात होते का म्हणू मी... राहण्यासाठी कुठे घर होत गेले? प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे मौनही माझे निरुत्तर होत गेले - कुमार जावडेकर

वाचने 4631 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चांदणे संदीप गुरुवार, 05/14/2020 - 13:37
पण, आत्मनिर्भर वाचून वेगळ्या अपेक्षेने आलो होतो. ;) सगळे शेर आपापल्या जागी उत्तम! सं - दी - प

मान आणि खांदा यामधली गॅप भरणारं एक सुखद कुशन घेऊन तुमचा प्रश्न सोडवता येतो. चपले ऐवजी सॅंडल्स वापरायला लागून जमाना झाला ( त्यात क्रॉक्सनी तर कमालच केलीये !). चप्पल दोन बोटात धरुन, दरवेळी उचलणं हा छळ आहे. गाविशी खुर्चीबाबतीत एकमते. आयुष्यातला प्राईम टाईम जिच्यावर बसायचं आणि ज्या कामातून तुफान मजा आणायची, ती खुर्ची अत्यंत आरामदायी हवी. माझी खुर्ची हाय-बॅक विथ नेक सपोर्ट आहे आणि फ्लेक्सी हँडल्समुळे खुर्चीवर मांडी घालून शांतपणे बसता येतं. मग कामाची मजाच काही और असते!