मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल

जाणिवांच्या जखमा

महेश रा. कोळी ·
काव्यरस
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये. हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये. काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या? काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये. ....म्हैश्या

माणसं वाचणारा शायर : राजेश रेड्डी

महासंग्राम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
असं म्हणतात गझल अनुभवण्याची गोष्ट आहे. मानवी मनाचं प्रतिबिंब गझलेत कायम दिसत आलं आहे. मीर तकी मीर, गालिब यांसारख्या कित्येक मोठ्या शायरांनी गझल रुजवली. मुघल काळात गझलेला राजाश्रय लाभला, एवढे भाग्य क्वचितच कोणत्या काव्य प्रकाराला लाभले असेल. पुढे दुष्यन्त कुमार, बशीर बद्र, निदा फाजली यांसारख्या लोकप्रिय शायरांनी हिंदुस्तानी भाषेत गझल लिहून ती अधिकच लोकप्रिय केली. आधुनिक काळात राजेश रेडडी हे नाव याच यादीत घेतलं जात. त्यांची उर्दू भाषेवर तेवढीच पकड आहे जेवढी हिंदीवर. त्यामुळे मातृभाषा उर्दू नसतांना त्यांनी उर्दू गझलेत जे मानाचं स्थान प्राप्त केलंय ते निश्चितच कौतुक करण्याजोगं आहे.

रंजीश हि सही

महासंग्राम ·
लेखनप्रकार
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा. जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते. अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा.

वाट वेगळी तिथेच नक्की झाली

drsunilahirrao ·
काव्यरस
जगात साऱ्या ओळख पक्की झाली या देशाची खूप तरक्की झाली हाती मोठे घबाड आल्यावरती नियत आपली चोरउचक्की झाली दोन दिशांनी आलो होतो आपण वाट वेगळी तिथेच नक्की झाली दाणादाणा जमवीत आली जनता: पीठ तयाचे,ज्याची चक्की झाली पाउल माझे तेव्हा चुकले आहे नजर तुझी जेव्हाही शक्की झाली डॉ. सुनील अहिरराव

बेशिस्त

शैलेन्द्र ·
लेखनविषय:
काव्यरस
पाहून वाट शेवटी पुढे निघून गेलो मी माझे आयुष्य थोडे जगून गेलो थांबण्याचा शब्द होता जरी दिलेला पावलांचे ऐकून बेवफा वागुन गेलो गुस्ताख आठवणींचे वादळ आंधळे आधार काडीचा घेऊन तगून गेलो शब्दांत माझी शिस्त मी सांभाळलेली पण आज बेशिस्त थोडी भोगून गेलो - शैलेंद्र

कोणते माझे वतन होते

drsunilahirrao ·
काव्यरस
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव

मला आवडलेला शायर- राहत इंदोरी

सुंड्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रात्रीचा एक वाजला होता दिल्लीच्या जीयासराय मधील अष्टशीला निवासाच्या २ऱ्या तळावरील चवथ्या रूममध्ये मी, माझा रूम पार्टनर संतोष, आणि दोन ‘शेजारी’- बाजूचे ‘प्रधानजी’ आणि वरच्या रूममधला संदीप असे तिघे चकाट्या पिटत होतो (संतोष फक्त ऐकायचा).प्रधानजींनी संदीपची काहीतरी चिमटी काढली आणि संदीपने सहज उत्स्फूर्त आवाजात हे म्हणन सुरु केलं- उसकी कत्थई आंखो मे है जंतर-मंतर सब, चाकू-वाकू छुरीया-वूरीया खंजर-वंजर सब जबसे तुम रुठी हो मुझसे रुठे रुठे से राहते है, तकिया-वकीया चादर-वादर बिस्तर-विस्तर सब मै कब डूबुंगा फिक्र किया करते है, कश्ती-वश्ती, दर्या-वर्या लंगर-वंगर सब... “वा वाह!!.....गजब” -मी “जियो क्या ब

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·
लेखनविषय:
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे

गझल - आणि हा खेळ झाला

वेल्लाभट ·
लेखनविषय:
काव्यरस
जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक