बेंबटे राव कोचवर हातात विडिओ गेम चा रीमोट घेउन मग्न आहेत. इतक्यात सौ. बेंबटी हातात झारा, लाटणे , मोठा डाव किंवा तत्सम प्राणघातक वस्तु घेउन अचानक बेंबटेरावासमोर उभ्या राहतात.
सौ.बेंबटी: बोल माझ्याकडे .....
श्री. बेंबट्या: आता नाही हां......
सौ. बेंबटी: कसल गाणे गुणगुणत होतास काल?
श्री बेंबट्या: कसले गाणे?
सौ. बेंबटी: काल नाही का संध्याकाळी शेजारणी कडे बघुन म्हणत होतास ते गाणे.
श्री. बेंबट्या: "प्यार हुवा"
सौ. बेंबटी : हां तेच. आत्ताच्या आता मला बघुन ते गाणे म्हण. नाहीतर तुझा 'गेम ओवर'. (प्राणघातक वस्तुला दाखवत)
श्री. बेंबट्या: ठीक आहे. म्हणतो.