Skip to main content

धोरण

फक्त 'बी'

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 22/04/2009 05:59 या दिवशी प्रकाशित केले.

दहा वाजता ठाणे स्टेशनला उतरलो. आता रिक्षाची कटकट. रात्री दहा वाजता स्टेशनला रिक्षा मिळण्यासाठी 'पुर्वपुण्याई' सुद्धा पुरत नाही. त्यादिवशी काही पुण्यकर्म केले असेल तरच. बाहेर येतो तर ही मोठी लाईन. चालायला सुरु केले. म्ह्टल बघु मधे कुठे मिळाली तर.
दहा पावले चाललो नसेन, बाजुला एक रिक्षा उभी राहीली. रिक्षातुन एक चेहेरा डोकावला. "या सर, तुम्हाला सोडतो". लगेच बसलो रिक्षात.
"रामवाडी, ना" चेहेरा बोलला.
"लुईस वाडी" मी
काही हरकत नाही, मी घोड्बंदरला चाललो आहे.
माझ्या काही लक्षात येइना. हा कोण ते.
मला गप्प बघुन तो म्हणाला, "काय, सर ओळखले नाही का"?
" नाही ब्वॉ" मी

अस्वल

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 20/04/2009 07:04 या दिवशी प्रकाशित केले.

का रागावलात हो बाबा माझ्यावर.
मला न सांगताच निघुन घेलात.
तीन दिवसांसाठी आजीकडे गेले, परत आले तेंव्हा दिसलाच नाहीत.
फोन पण करत नाहीत तुम्ही.
आधी कसे कॉलेजमधे पोचताच फोन करायचात.
तुमचा फोन आल्याशिवाय मी शाळेत जायची नाही.
'ठकु' म्हणायचात तुम्ही मला.
मला ते खुप आवडायचे.
बाबा, मी सध्या कुणाशी जास्त बोलत नाही. आईशी सुद्धा नाही.
आधी किती बड्बड करायची मी.
ती पण किती बदलली आहे.
तुम्ही असताना कुठे लिपस्टीक लावायची.
आता भडक रंगाच्या लावते.
आधी नेहेमी साडी घालायची.
आत्ता कसले कसले गाउन घालते.
सिनेमातल्या हिरॉइन सारखे
मला नाही आवडत.

आणि माझा मारुती झाला.

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 19/04/2009 07:31 या दिवशी प्रकाशित केले.

शेवंताने दीव्याच्या ज्योतीवर भाकरी भाजली आणि मारुतीने अचंब्याने तोंडात बोट घातले.
मुळ केसच्या ऑडीओ स्क्रिप्टमधले एफ वर्ड्स मी गाळलेले आहेत, आणि बरेचसे शब्द मवाळुन लिहीले आहेत
_____________________________________________________

एंट्री

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 15/04/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.

असाच एक मुंबईमधला नाका.
सकाळची १० ची वेळ.
मी थांबलो होतो बस करता.
इतक्यात एक टेंपो येताना दिसला. लक्षात राहायचे कारण असे की त्यात ड्राईवरच्या बाजुला एक पन्नाशीचे गृहस्थ कोंबुन बसले होते.
ड्राईवरने टोल भरला.
जरा पुढे आल्यावर ऑक्ट्रॉयच्या शिपायाने टेंपो अडवला. गृहस्थ खाली उतरले. त्यांनी शिपायाला एक पत्र दाखवले. पण शिपाई काही टेंपो सोडेना. साधारण बोलण्यावरुन गृहस्थ मास्तर असावेत असे वाटले. ही जात कुठुनही ओळखता येते. थोड्या वेळ्याने मास्तर रागारागाने मोठ्या साहेबाला भेटायला ऑफिसमधे गेले. १५ मिनिटाने विलक्षण तापलेला चेहेरा घेउन बाहेर आले.

गणित

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 11/04/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.

तो आला का ग?
कशाला वाट बघत आहेस त्याची?
नाही येणार तो.
एकदाच चुकलीस तु.
बेरीज केलीस वजाबाकी झाली.
काहीही झाले नाही आहे मला.
परवा परवा तर खेळलो आपण 'चेरीचा' खेळ
आज दिसली नाहीस.
का मलाच झोप लागली होती?
दोन्ही गालावरच्या तुझ्या खळ्यात मी मला शोधतो.
गमतीने म्हणायचो तुला
तु असलीस तर पाण्याची टंचाई नाही.
दोन बालद्या पाणी तर तुझ्या गालावरच्या खळ्यात साठवता येईल.
कालच स्वप्न सांगु का तुला?
उगाच अर्थ शोधायचा नाही.
डोळ्यात पाणी आणायच नाही.
वचन दिले आहेस तु मला.
त्याची वाट तर अजिबात बघु नकोस.
अग बटण शेवटी तीसराच दाबणार ना?

चला लेखक होउया !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 11/04/2009 11:24 या दिवशी प्रकाशित केले.

स्थळ :- आमचे कार्यालय

वेळ :- कुठलीका असेना ? कोणाला काम करायची आहेत ?

पात्र :- खुद्द आम्ही आणी आमचा एक नविनच आमच्या आग्रहा खातर मिपा जॉइन केलेला सहकारी.

मित्र :- काय रे मिपा मिपा चालु आहे का ?

आम्ही :- हाना राव ! दुसरे धंदे काय आपल्याला ? त्यात आज एक लेख टाकलाय, प्रतिक्रीया वाढतायत का नाही त्यावर पण सारखे लक्ष ठेवुन आहे.

शर्यत

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 10/04/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.

आताशा तुझी काळजी वाटते मला.
तु म्हणतेस की बराच शांत झालो आहे.
खरे तर खुप अस्वस्थ आहे.
लग्नानंतरचे १ ले वर्ष सोडले तर तु स्वःतला मुलाभोवती केंद्रीत केलेस.
तुझ्या आयुष्याच्या वर्तुळाचा केंद्रबिंदु होता तो.
अर्थात बाकीच्या जबाबदार्‍या पण समर्थपणे पेलल्यास.
बायको, सुन, काकी, मामी, मावशी ही नाती सांभाळताना कुठेही कमी पडली नाहीस.
सर्व कुटुंबात तुझा उदो उदो आहे.
ही कर्तव्य पार पाडताना कुठे गुंतली नाहीस.
माझ्यात सुद्धा नाही.
अर्थात त्या बाबत आज माझी काहीही तक्रार नाही.
फारसे सख्य नसलेल्या जावेच्या नातीत गुंतायला का लागली आहेस?

अपुर्ण वर्तुळ

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 09/04/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.

एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मधे तुझी केस नेमकी माझ्या टेबलवरच यावी हा निव्वळ योगायोग नसणार.
"डॉक्टर, होइल ना हो मुल"?
आधी वाटले की तु चेष्टा करत आहेस. सासु समोर ओळख न दाखवता ओळख आहे का? हा प्रश्न विचारलास होतास तु.
११वी त मधल्या सुट्टीत शेपटीशी खेळत तुझ्या अनुनासीक स्वरात विचारले होतेस तु
"डॉक्टर, मला तुझ्या नोटस देशील ना?
माझ्या शाळेतल्या टोपण नावाने हाक मारताना आजही तु ओठ दाताखाली चावला होतास सवयीप्रमाणे.
१८ वर्षात तसा तुझ्यात काहीही फरक पडला नव्हता की माझ्यात.
दोन शेपट्या घालुन शाळेत गेली असतीस तर ११वी च्या वर्गात आरामात बसली असतीस.

मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 08/04/2009 23:54 या दिवशी प्रकाशित केले.

प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती..

आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा.

त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल. अजून चैत्र संपायचा आहे तोवर मिपावर चैत्रगौरींचं ह़ळदीकुंकू धुमधडाक्यात साजरे करीन म्हणतो!