सी.ए.एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड- २
मास्तरला प्रष्न पडला तात्याबा ना गाठावे तरी कसे. कधीही फोन केला की तात्या प्रतिक्षिप्त क्रियेत उत्तर द्यायचे. "मी आता बिझी आहे. शनिवार रविवार कधीतरी भेटु" करावे तरी काय? तात्यांचे बरेच उद्योग आहेत हे मास्तराना माहित होते. त्यात दिवस रात्र प्रार्थना, शेळी पालनाची भर पडली होती. जंगलात जाउन शेळीच्या जखमासाठी पाला गोळा करणे येरा गबाळांचे काम नाही. ह्या नादात तात्यानी तंबोरा वादनाचे क्लासेस तुर्तास बंद ठेवले होते. त्यामुळे देशी आणि आंग्ल युवतींची भलतीच कुचंबणा झाली होती.पण मास्तर पडला चिवट.
मिसळपाव