आवरा रे ह्या नातेवाइकांना
"आता जबाबदारी मी घेतली आहे , तुम्ही निवांत रहा. मी सगळे बघुन घेतो." काकुंना मी सांगितले.
हॉस्पिटल ऍड्मिनिनस्ट्रेशन मधे असताना पेशंटचे नातेवाईक कसे पिडतात ह्याचा मला पुर्ण अनुभव होता. त्यातल्या त्यात एखादा मेडिकल रेप. निघाला तर मग काही विचारुच नका. असो.
काकुंच्या यजमानांचे जबड्याचे ऑपरेशन होते. 'गुटका कींग' होते काका. त्यामुळे ताबडतोब सर्जरी अनिवार्य झाली होती. दोन्ही मुले व सुना अमेरिकेत. आय्.टी त असल्यामुळे लगेच रजा घेणे शक्य नव्हते. आणि घेण्याची हिंमत नव्हती. कायमची रजा मिळायची शक्यता नाकारता येत नव्हती. मुलाचा मला फोन आला. मी जबाबदारी स्विकारली.
ऑपरेशन च्या दिवशी नेमक्या जवळ्च्या ४ जणानाच कळवले. सगळयाना कळवले असते जमा झालेल्या गर्दीला आवरणे कठीण गेले असते. आणि सर्व मंडळी येउन काय करणार होती. मदती पेक्षा त्रासच जास्त.
पेशंट्ला ऑपरेशन थिएटर मधे नेल्यावर ३ तास वेळ निवांत होता. आदल्या दिवशी कुटूंबाने पेशंटची आवड ओळखुन जेवायला गरम भाताबरोबर तिरफळाची आमटी दीली होती. ती पेशंटला आणि काकुना खुप आवडली होती. काकुनी भावविवश होउन आदल्या दिवशीच्या जेवणाचा विषय काढला. 'खाता पीता माणुस, आता फक्त लिक्विड डायेट'. तुझ्या बायकोला माझे आशिर्वाद आहेत हो, वगैरे, वगैरे. मी म्हटले, हे बघा काकु, पुढील १५ दिवस तरी असे काही विषय काढु नका. फक्त फोन करा. सर्व हजर होईल. उगाच घरी येण्याजाण्यात वेळ घालवु नका. काकांबरोबर रहा. तुमच्या चहापाण्याची, दोन्ही जेवणाची जबाबदारी माझी बायको बघुन घेईल. कुठ्ल्याही नातवाईकाना काहीही कळवु नका. त्यांचे सर्व 'संगीत मानापमान' मी बघुन घेईन. तुम्ही फक्त माझ्याकडे बोट दाखवा. जवळच उभे असलेले काकांच्या नातेवाईकाला राहावले नाही. लगेच 'धीस इज नॉट रिक्वायर्ड'चे वाक्य आले. मी म्हणालो, ठीक आहे, मग तुम्ही घ्या सर्व जबाबदारी , मी आहेच बरोबर. चेहेरा पडला त्यांचा. पुढे बोलायची गरज लागली नाही. 'बायको पीडीत' मेंबरांचा हा अध्यक्ष. एकदा खाजगीत म्हणाला होता,"आयला, बायकोला ना मगर असलेल्या नदीत ढकलायला पाहीजे". पण नको ते पण योग्य नाही. मगरींना कृयेल्टी केली म्हणुन प्राणिसंरक्षक समिती केस करेल".
ऑपरेशन व्यवस्थीत पार पडले. पेशंटला आय्.सी.यु. त ट्रांसफर केले गेले. काकु सुखावल्या. तीतक्यात बायको काकूना जेवण घेउन आली.
सकाळपासुन उपाशी असलेला जीव पोटभरुन जेवला. जेवणात बायकोने नारळ न घातलेला 'कोळंबा' केला होता. गरम भाताबरोबर तुप आणि ही आमटी कॉम्बिनेशन झकास जमले. काकु तृप्त झाल्या. मी कीती लकी असल्याचे सर्टिफिकेट पण मिळाले. हे सर्व 'मिस्टर मगर' बघत होते.
सर्व सेटल झाल्यावर मी घरी आलो. जेवण झाले. आता जरा लवंडुया म्हणतो तर कुटुंबाचा मोबाईल खणाणला. बघतो तर फोनवर 'मिसेस मगर'. फोनवरच्या संभाषणावरुन परत आशिर्वाद वगैरे झाले ह्याचा अंदाज आला. सुमारे १५ मिनिटाने कुटुंबाच्या चेहेर्यावर आष्चर्य बघितले. लक्षात आले मगरीने चावा घेतला होता. तीने नेमके काय काय म्हटले हे मला कधीच कळणार नाही हे मला माहीत आहे. बायकोही कधीच सांगणार नाही. पण अंदाज करणे कठीण नव्हते. एकंदरीत मी घेतलेल्या पुढाकाराबद्दल 'वैधानिक इशारे' असणार. सर्वात कहर म्हणजे जाता जाता त्या महामायेने 'कोळंब्याची" पाककृती सुद्धा विचारली. अरे प्रसंग काय हे तरी ओळखा.
संध्या़काळी काकुना चहा आणि फराळ घेउन गेलो होतो. समोर परत मीसेस मगर हजर. तोंडाचा पट्टा सतत चालु. आम्ही परके झालो इत्यादी ,इत्यादी. काकू हैराण. माझी ख्याती कानावर असल्यामुळे मला बघितल्यावर तोंड लगेच बंद केले. दोघेही घरी रवाना झाल्यावर काकू म्हणाल्या, "सोडवलेस रे बाबा, काय विचीत्र बाई आहे." आय्.सी.यु. मधे पॅरॅलीसीस चा ऍटॅक कसा येतो ह्यावर बोलत होती. नशीब, काका झोपले होते.
घरी गेल्यावर मिस्टर मगरला फोन केला आणि स्पष्ट सांगितले, तुमच्या मिसेसना हॉस्पिटल मधे पाठवु नका.त्या परत आल्या तर प्राणिसंरक्षक समितीच्या केस ला सामोरे जायला मी तयार आहे".
याद्या
3290
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>" आय्.सी.यु.
एकदम चंपक
प्राणीसंरक्षक
अलंकारिक अनुभव
उत्तर
अवलिया
In reply to उत्तर by विनायक प्रभू
बापरे! खूप
मित्र
"तुमच्या
हा हा!
खास..
खरंच.. अशा
एकदम फंडु
ओघवता लेख