"सात वर्ष झाली काका, आयुष्याचे जवळ जवळ वाळवंट झाले आहे". श्रीयुत करमरकर
रंगपंचमीची सुट्टी होती. अख्खा दिवस लोळुन काढला. संध्याकाळची वाट बघत होतो. सामुदायिक तिर्थप्राशनाचे आमंत्रण होते संध्याकाळी. बायकोला साधारण सालाबादचे कार्यक्रम माहीत असतात. सुमारे ५ वाजता तीचा फोन वाजला. साधारण बोलणे कानावर आले. मला न विचारता कुणाला तरी संध्याकाळी घरी यायचे आमंत्रण दीले होते. आज्ञा पण झाली, संध्याकाळी ६ ते ७ पर्यंत कुठेही जायचे नाही. चुलत बहीणीच्या ओळखीचे दांपत्य येणार होते मला भेटायला.