Skip to main content

अर्थ

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 24/03/2009 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मला साधे मराठी येते. मी लेखक आहे असा गैरसमज कधीच करुन घेतला नाही. माझी मिपाकरांना नम्र विनंती आहे की मला खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. दोन दिवसापासुन डोक्याचा फार आणि पार खुळखुळा झालेला आहे. बर्‍याच जणाना विचारला पण नीटसे काय कळाले नाही. लिखाळ, व मुक्तसुनित ह्यानी अर्थ सांगितला. पण माझ्या डोक्यावरुन गेला. बहुधा तो अर्थ समजण्या इतके पुण्य कर्म मी आदल्या दिवशी केलेले नव्हते. दोष माझा. "आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय? म्हणजे नेमके काय करतात. हे वाक्य एका मराठी संस्थळाच्या संपादकाने उच्चारलेले आहे. वैधानिक इशारा: मला सर्व मराठीसाठी झट्णार्‍या संस्थळाबद्दल आदर आहे. अशी बरीच आहेत. ती नेमकी कुठली आहेत हे जाणुन घेण्यात मला रस नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3741
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

नको तिथे जायला कुणी सांगितले ? --अवलिया

शुचिता(शुध्ध ह्रुदय) म्हणजे शुद्धी ना? मग लेखन शुचिता म्हणजे शुध्ध लेखन.आन्ग्ल भाषेत puritanical का काय म्हणतात तसला प्रकार असावा.

तुम्ही त्या संस्थाळाला काही लेख पाठवल्यावर ते असे म्हणाले का?

In reply to by आनंद

मी कशाला पाठवतोय? आधीच नियमावली सांगताहेत. असो.

"आम्ही लेखन शुचीता संभाळतो." ह्या वाक्याचा अर्थ काय? म्हणजे नेमके काय करतात. हे वाक्य एका मराठी संस्थळाच्या संपादकाने उच्चारलेले आहे. उच्चारलेले म्हनजे तोंडाने बोललेय ना ? तुम्हाला उद्देशूनच ना. आता खरं खर् सांगुन टाका मास्तर कुठल्या विषयावरचा लेख होता ते.

बहुधा फाट्यावर मारतो, बाझवला वगैरे शब्दांना बंदी असावी. खराटा (रंग माझा वेगळा)

काही प्रश्नः १. तुम्हाला त्या वेबसाईटवर लिहायचं आहे का? २. गरज कोणाला आहे, दुसर्‍या शब्दांत, "लेख लिहाल का" असा प्रश्न आला का "लेख लिहू का" असा प्रश्न विचारला? अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by विनायक प्रभू

१. जिस रास्ते जानाही नही उसका पता क्यू पूछ रहे हो? २. त्यातून, त्यांनी विचारलं तर अटी तुम्ही घालायच्या का त्यांनी? अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

चला एकदाचा अर्थ मिळाला. प्रा.डॉ. नी खव मधे मला कळेल असा अर्थ सांगितला. एकंदरीत मला न झेपणारे प्रकरण. त्या बरोबर 'साधन शुचीता' चा अर्थ पण सांगितला. प्रा.डॉ.चे धन्यवाद.

In reply to by विनायक प्रभू

आपल्या खव मधील अर्थ वाचला. भावला व पटला. विशेषतः आपल्या कामातही (माध्यमांचे) पावित्र्य पाहिजे या अर्थाने साधनशुचिता शब्द वापरत असावेत... हे वाक्य ज्ञानज्योती उजळुन गेले. आज मला कळाले की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोला फुले का वाहतो व बायको नवर्‍याला दुधाचा नैवेद्य का दाखवते ते. बुद्धाला बोधी वृक्षाखाली साक्षात्कार झाला, मला तुमची खव वाचुन झाला ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

>> आज मला कळाले की लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा बायकोला फुले का वाहतो व बायको नवर्‍याला दुधाचा नैवेद्य का दाखवते ते. =D> =D>