वाळवंट
"सात वर्ष झाली काका, आयुष्याचे जवळ जवळ वाळवंट झाले आहे". श्रीयुत करमरकर
रंगपंचमीची सुट्टी होती. अख्खा दिवस लोळुन काढला. संध्याकाळची वाट बघत होतो. सामुदायिक तिर्थप्राशनाचे आमंत्रण होते संध्याकाळी. बायकोला साधारण सालाबादचे कार्यक्रम माहीत असतात. सुमारे ५ वाजता तीचा फोन वाजला. साधारण बोलणे कानावर आले. मला न विचारता कुणाला तरी संध्याकाळी घरी यायचे आमंत्रण दीले होते. आज्ञा पण झाली, संध्याकाळी ६ ते ७ पर्यंत कुठेही जायचे नाही. चुलत बहीणीच्या ओळखीचे दांपत्य येणार होते मला भेटायला. काय नेमका त्रास होता त्याबद्दल नक्की काय कळाले नाही.
पुरणपोळीचा मान ठेउन मी पण जास्त खोलात शिरलो नाही.
________________________________________________________
श्री. सौ. करमरकर बरोबर सहा वाजता पोचले. बायकोने चहा दीला आणि ती नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भा़जी आणायला निघुन गेली.
बायको बाहेर गेल्यावर लगेच करमरकर आढेवेढे न घेता मुळ प्रश्नावर आले. करमरकर उवाच खालीलप्रमाणे:
आमचे लव मॅरेज. ४ वर्ष हिंडलो फिरलो. नंतर लग्न केले. दोन्हीकडुन विरोध होता लग्नाला. लग्नानंतर दोन वर्षानंतर मुलगा झाला. सात वर्ष खरेच कशी गेली ते कळालेच नाही. मुलगा ५ वर्षाचा असताना ही गोष्ट झाली. मुलाची झोप जरा सावध. अचानक मधेच उठला. गडबडलो आम्ही दोघेही. पण वेळ मारुन नेली. दुसर्या दिवशी मुलाने मोघम प्रश्न विचारला. तो येणारच अशी खात्री होती त्यामुळे उत्तर तयार होते. त्या दिवसापासुन हीच्या मना॑तली अपराधी पणाची भावना काय जायला तयार नाही. चार दिवसापुर्वीची गोष्ट. सुट्टीचा दिवस होता. कोचवर बाजुला बसली होती. बर्याच दिवसाने दिवसाने बाजुला बसली, कधी नव्हे ती खांद्यावर मान ठेवली. बरे वाटले.इतक्यात मुलाची चाहुल लागली आणि पटकन उठुन बाजुला झाली. आतापर्यंत साधारण १०० वेळ तोच प्रश्न विचारला आहे हीने. " मुलाने बधितले असेल का? त्याला काय वाटले असेल. मला लाज वाटते त्याच्याकडे बघायची." आता तुम्हीच काय ते बघा. माझ्याकडे उत्तर नाही. आणि खरे सांगायचे झाले तर She was the wildest one for all these 7 years of marriage. That is why her behaviour about married life is confusing.
________________________________________________________
साध्या गोष्टीचा नासुर करण्याची काय हौस असते काही जणांना. ५ वर्षाच्या मुलाने बघीतले. फारसे लक्षात राहायचे काहीही कारण नव्हते.
मुलाच्या वागण्यात तरी तसे काहीही नव्हते. २०० चॅनेलवर पोसल्या गेलेल्या पीढीला त्याचे फारसे कौतुक असण्याचे काय कारण? फारच टोकाची भुमिका घेण्यात काय अर्थ. काळजी घ्यायला हवी. पण अशा गोष्टीना घाबरुन सहजिवनाचे वाटोळे करण्यात काय अर्थ होता. मुलगा समोर आहे म्हणुन बायकोपासुन १० फुट अंतर.??? ठीक आहे, वन बी.एच्.के. मधे थोडीशी कुचंबणा होते. पण देवाने दीलेल्या डोक्याचा वापर कधी करणार. मिळाला तो वेळ आपला. तो अमुक एक असावा असे काय स्टँप पेपर वर लिहुन दीले होते काय?
इतर अडचणीवर मात करताना युक्ती वापरतो की नाही. तसेच इथे.
मी दोघानाही मुलासमोर आपल्यातले अंतर हळु हळु कमी करायचा सल्ला दीला. शक्यतो नॉर्मल रहा.
आधी बाजूला बसा.
बोलण्यात एकमेकाना साथ द्या. त्याच्या समोर एखादा विनोद सांगुन खळखळुन हसा दोघेही.
नंतर हातात हात धरा.
खांद्यावर हात टाका. साधारण ३ महिन्यात येथे पोचलात तर बाकीच्या गोष्टी आपोआप व्यवस्थीत होतील.
कुणीतरी सल्ला दिला होता की मुलांना अशा गोष्टींचा ट्रॉमा होतो. आजकाल मुलांना कशाकशाचा ट्रॉमा होतो हे सांगणे कठीणच आहे.
मुलांची सुट्टी आणि श्रीयुतांची सुट्टी मॅच होत होती. ती मिसमॅच केले की सर्व प्रश्न सुटणार होते.
हे नक्की २००९ साल चालु आहे का?
जाता जाता: छापलेल्या चित्रात बेस कलर मॅजेंटा हा महत्वाचा असतो.
आजकाल गाडीचा वापर अगदी कमी असतो. मुलाला गाडी फुल टँक ठेवणे आवडत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आठवड्याला एकदा पाच लीटर पेट्रोल भरतो.
याद्या
2625
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म
छान लिहिलेत..
प्रभुचं
In reply to छान लिहिलेत.. by राघव
सुंदर
छान
वाळवंट!
मुद्दा काळजी करण्यासारखा आहे