दहा वाजता ठाणे स्टेशनला उतरलो. आता रिक्षाची कटकट. रात्री दहा वाजता स्टेशनला रिक्षा मिळण्यासाठी 'पुर्वपुण्याई' सुद्धा पुरत नाही. त्यादिवशी काही पुण्यकर्म केले असेल तरच. बाहेर येतो तर ही मोठी लाईन. चालायला सुरु केले. म्ह्टल बघु मधे कुठे मिळाली तर.
दहा पावले चाललो नसेन, बाजुला एक रिक्षा उभी राहीली. रिक्षातुन एक चेहेरा डोकावला. "या सर, तुम्हाला सोडतो". लगेच बसलो रिक्षात.
"रामवाडी, ना" चेहेरा बोलला.
"लुईस वाडी" मी
काही हरकत नाही, मी घोड्बंदरला चाललो आहे.
माझ्या काही लक्षात येइना. हा कोण ते.
मला गप्प बघुन तो म्हणाला, "काय, सर ओळखले नाही का"?
" नाही ब्वॉ" मी
त्याने खुलासा केला, आणि लक्षात आले.