ऍट्लास
लेखनप्रकार
तुम्ही कधी प्रभादेवी ओलांडुन वरळीला जायच्या कोपर्यावर सेंचुरी मील्स चा मोनोग्राम बघितला आहे?
पुर्ण पृथ्वी खांद्यावर घेतलेला आणि त्यामुळे त्रासलेला ऍटलास.
----------------------------------------------------------------------------------------------
का, हो तुम्हाला आपली नोकरी गेली तर काय होणार ह्याची भिती वाटते का? - ऑफिसला जाताना बायकोने पँटीत विंचु सोडला.
नोकरी करत नाही मी. कंसलटंट आहे मी.- माझा डीफेंस.
तेच ते. काय ते तुम्ही ट्ण्ट्ण करता ते उद्या नसेल तर?
२ महीने जरा त्रास होईल. परत मुळ पदावरयेईल सर्व काही. तु काळजी करु नकोस. - मी आश्वासन दीले.
ते कसे काय? - बायको
अग हा नाही तर तो. दोन लाईनीत उभेच आहेत.
( बहुतेक कुठल्या तरी एम्.एल्.एम. च्या बैठकीला गेली असणार मैत्रीणीच्या आग्रहामुळे)
_______________________________________________________
तु सांग विन्या, हे बरोबर आहे का? मक्या म्हणाला.
आता लाईनीत उभे राहुन तिकिट काढायचे त्रास वाचवलेल्या वर्गमित्राला आत कल्याण पर्यंत सहन करण्याशिवाय विन्याला पर्याय नव्हता.
अरे चांगल्या सल्ल्याची कदर नसते. मी डेप्युटेशन वरती भायखळा ब्रँचला गेलो होतो. नविनच मॅनेजर होता. दोनच दिवस झाले होते.
मी ऑडीट करत होतो. इतक्यात सुमारे १लाखाची कॅश आली. अकाउंट मॅनेजर ला बर नव्हते. त्यामुळे कॅश चे काय करायचे हा प्रश्न आला. मी मॅनेजरला सांगितले. ठेव्,सेफ मधे. सोमवारी बँकेत घालु. त्याने मान हलवली.
मी चहा प्यायला गेलो. परत आलो तर महाशयानी ती कॅश एका नविन प्युन कडे दीली होती. आणि लोखंडवालाला मालकांकडे पोचव असे सांगत होता.
मी का असा प्रश्न विचारला तर म्हणतो, यु आर नॉट माय बॉस. आय हॅव टॉक्ड टु द ओनर. अँड आय ऍम फॉलोइंग इंस्ट्रक्शन्स.
अरे बाबा, मालकांना कुठे माहीत आहे की ह्या प्युन ची लायकी काय आहे ते. हा जुना माणुस असता तर हरकत नाही. त्याला नीट पत्ता माहीत नाही. धोका दायक आहे ते. त्या एरीयात ओला रुमाल घेउन तयारच असतात मंडळी. दिसला कोंबडा की घाल रुमालात.
आता एवढे चांगले प्रेमाने सांगत होतो तर अयकयला तयार नाही.
मला शटाप म्हणाला.
दोन कानाखाली वाजवणार होतो, पण म्हटले कशाला नविन नोकरी लागली आहे, आयटी तना पिंक स्लीप मीळालेला. कशाला उगाच कुणाच्या पोटावर पाय आणायचा म्हणुन गप्प बसलो.
त्याने मालकांना फोन लावला. त्याच्याशी बोलल्यानंतर मालक माझ्याकडे बोलले. त्यांना माझे म्हणणे पटले. मी पण मालकाना सरळ म्ह्टले, आज सोडले, पुढच्या वेळी शटाप म्हणाला तर त्याचे दात पाडीन नंतर फोन करेन्.
मालक म्हणाले, यू हॅव टु लर्न टु मुव ऑन. डॉन्ट मेक इश्यु ऑफ दॅट शटाप.
आता हे बरोबर आहे का सांग.
विन्या जर गप्प झाला आणि मग म्हणाला,
मक्या मला वाटते की तु स्वःत ला फसवतो आहेस. तुला आपली शेवटच्या चार वर्षाची नोकरी वाचवायची होतीस म्हणुन तु गप्प बसलास.
किंवा तु स्वःतला ऍट्लास समजतोस. सर्व कंपनी आपल्यामुळे चालते असे समजणारा.
तसे वाट्णारा तु पहीला किंवा शेवटाचा नाहीस. ह्या भ्रमातुन आपण सर्व केंव्हाना केंव्हा जातोच. भ्रमातुन बाहेर पड सुखी राहशील.
आणि मालक म्हणजे पण एक जास्त पगार घेणार नोकरच. त्याच्या गरजांची शुन्य जास्त. त्याचे भोज्जे तुझ्यापेक्षा किती तरी मोठे.
त्याना सुद्धा सर्व बाजू बघायला लागतातच की. ताज्या दमाची टीम ऍटीट्युड दाखवणारच की. जरा डोके वापर. दोस्ती कर. कदाचीत तोच तुझे ओझे कमी करायला धावुन येईल. आणि तुझ्या निरोपसमारंभाला अगदी डोळ्यात पाणी येइल असे भाषण करेल.
अरे एवढ्या मोठ्या चक्रातले तु एक छोटेसे चक्र. अगदी डीस्पेंसेबल. उगाच त्रास करुन घेउ नकोस.
फास्ट गाडी असल्यामुळे कल्याण लवकर आले. नशीब विन्याचे.
वाचने
3503
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
हे लेखन
In reply to हे लेखन by अवलिया
नाना
In reply to नाना by सहज
+!
In reply to +! by दशानन
अरे तेच तर सांगतोय मित्रांनो!
In reply to अरे तेच तर सांगतोय मित्रांनो! by अनंता
दिव्य दृष्टी
In reply to नाना by सहज
असेच म्हणतो
मास्तर लिहित राहा !
एकदम सही
मस्त
इतके
सेंच्युरी!
सर तुम्ही
विप्रसर,
मास्तर
विषयाशी संबधीत...