बाबा, तुझे आनंदाचे सर्वोकृष्ट क्षण कुठले? चिरंजिवानी विचारले.
हा प्रश्न कट्टा झाल्यावर त्याने विचारला होता म्हणुन लगेच उत्तर दिले नाही.
कधी पटात घुसेल त्याचा नेम नाही.
कट्ट्याला तात्या,सर्वसाक्षी,जोशीबुवा आणि रामदास होते.
खाना खजाना साठी सौ .दिमतीला होती.
कट्टा होत असताना चिरंजिव कट्ट्याला पाठ करुन गुगलत बसले होते.
तु सांग बघु? मी प्रतिप्रश्न केला.
तेवढाच विचार करायला वेळ.
तुम्ही सर्वजण सगळेजण बागडत होतात बाबा. अगदी कॉलेज कुमारांसारखे. मला मजा आली. तुम्ही तर सर्व नॉटी मोड मधे होता..