मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

डावखुरा ·
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

सोने = ५०० रु./ तोळा

jaypal ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिनांक १५ आगस्ट २४२० भारतीय पंतप्राधानांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट घेउन अमेरीकेस भरघोस मदतीची घोषणा केली. . . . . . . भारत हा एक शांतताप्रिय आणि खरोखरीच एक शांत देश आहे. . . .

त्या कथेचा निषेध्,धिक्कार!!

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खुप दीवसांपासुन लिहीन म्हणात होतो,तर आज लिहतो. काही दीवसांपुर्वी Star प्रवाह ह्या गरज नसताना चालु असलेल्या वाहीनीवर "गोष्ट एका आनंदीची" ही मालिका चालु होती.ती मालिका म्हणजे मालिकांची 'मालिका' होती,म्हणजे 'गोष्ट एका लग्नाची'.नंतर "गोष्ट एका कॉलेजची"............वगैरे आणि नंतर हे "गोष्ट एका आनंदीची". त्या कथेत आनंदी एक आंधळी मुलगी असते,दीसायला सुदंर....लग्नाच्या वयात आलेली.आई बाबांची लाडकी,त्या आईबाबांना सारखी तिची काळजी.......तिच लग्न कस होईल,नवरा हीला प्रेम देइल का,सासरची माणस कस वागवतील वगैरे.हीच ऑपरेशन करुन तिला द्रुष्टी येणार नाही अस त्यांच्या डॉ़क्टरांच मत असत. काही काळाने तिच्या लग्नासाठी

कसाबला अखेर फाशी

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी कसाब याला न्यायालयाने दोशी ठरवत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. त्याला वरील न्यायालयात अपील करु न देता लागलीच शिक्षेची अंबलबजावणी करावी . या हल्ल्यात शहीद झालेल्याना खर्‍या अर्थाने आता न्याय मिळेल असे वाटते. अमोल -------------------------------------------------------------------------------

मिसळपाव...

नीलकांत ·
लेखनप्रकार
नमस्कार, आपण सर्व मिपाकर हे जाणतो की मिसळपाव हे संकेतस्थळ श्री तात्या अभ्यंकर यांनी स्थापन केले आहे. ते या संकेतस्थळाचे मालक सुध्दा आहेत. गेल्या काही महिण्यांपासून मिपाच्या व्यवस्थापनाकडे तात्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने मी व संपादक मंडळानेच मिपा सुरू ठेवलंय. आता सुध्दा येत्या काही काळ तात्यांना मिपाकडे लक्ष देणे होणार असे दिसत नाही. त्यामुळे तात्यांनी आधी अघोषीत असलेली व्यवस्था घोषीत केलीये की मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार नीलकांत कडे असतील. यात मालकी हक्काबाबत कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे त्याबाबत वर केलेल्या विधानाशिवाय काहीही उल्लेख करने गैरलागू आहे.

दोन शब्द...

नीलकांत ·
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, एवढ्या दिवसांच्या मिपाच्या प्रवासातील एक अशी माझी ओळख आज पर्यंत होती. तात्यांनी ही नवी जवाबदारी दिली आहे त्या जवाबदारीवर मी खरा उतरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. मिसळपाव उभं करतांना ज्या उद्येश्यांना सामोरे ठेवलेलं होतं त्याच दिशेने मिसळपावची वाटचाल व्हावी अशीच भूमिका असेन या कडेही जाणीवपुर्वक लक्ष देईल. सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय.

निवेदन...

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर मायबापहो, गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणाने मी मिपापासुन दूर आहे. माझ्याही आयुष्यात बर्‍याच त्रासदायक गोष्टी घडल्या/ घडत आहेत. येणारे काही दिवस मी या गोष्टींतच व्यस्त असेन असे वाटते. या आणी अश्याच अजून काही कारणांमुळे मला मिसळपावच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे शक्य होणार नाही असे दिसते. दिवसेंदिवस येणारे नवनवीन लेखकांचे तसेच प्रस्थापितांचे लेखन मिपाला समृद्ध करत आहे हे पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपण सर्वजण मिपाला असेच समृद्ध करत राहाल अशी आशा करतो. यापुढे माझ्याऐवजी नीलकांत सर्व व्यवस्थापन पाहील असे मी येथे जाहीर करत आहे.

अर्थ आवर-Earth Hour

बेभान ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
उद्या, म्हणजे शनिवारी, २७ मार्च दिवशी, रात्रि ८:३० ते ९:३० हा एक तास Earth Hour (अर्थ आवर) म्हणुन पाळला जातो. या एक तासामध्ये सर्व उद्योगधंदे, सर्व संस्था आणि घरातील विनाकारण चालू असलेली विजेची उपकरणे बंद ठेवण्याचे अवाहन wwf- वर्ल्ड वाईल्डलाईफ़ फंड या संस्थेने केला आहे. होणा-या हवामानबदलाच्या परिणामाविषयीची जागरुकता वाढविण्याच्या दृष्टीने या संस्थेने २००७ पासुन हे पाऊल उचललेले आहे. आयफेल टॉवर, दिल्लीच्या लाल किल्ल्यामधे ही हा ’अर्थ आवर’ पाळला जातो.