Skip to main content

धोरण

असले पण गुरु असतात!

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 26/07/2010 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार........ हा लेख माझ्या आवड्त्या पण आता भुतकाळात जमा झालेल्या मिपाच्या जुन्या रुपाला अर्पण. काल गुरुपोर्णिमा झाली,काहींनी लेख लिहुन तर काहींनी मनातच गुरुंविषयी आदर व्यक्त केला.पण ज्यांना नेहमीच खडुस्,मुद्दाम रागावणारे,जळपटे शिक्षक लाभले त्यांनी काय करायचं? गप्प रहायच?..........नाही,नाही तस कस चालेल? त्यांनी असे लेख लिहायचे. मी कालखंडानुसार सर्वांची 'ओळख' करुन देतो.आणि तुम्हाला काही अन्जान सत्याची जाणीव करुन देतो. काळ : १ ते ४ थी स्थळ : **** हायस्कुल्,बोरीवली. त्यादीवशी उशीर झाला होता.दुपारची शाळा होती.मी रडवेला झालो होतो,छडी घेउन मारकुट्या म्हशी (कुपोषीत)सारखी बघणारी ती 'बाई'

पाध्यांचे मनोगत

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदनः संपादकांच्या अधिकारांबाबत नाराजी व्यक्त करून वातावरण कलुषित केल्याचे प्रायश्चित्त म्हणून काही दिवस स्वसंयमाची रजा घ्यायचे ठरवले होते. त्यामुळे गढुळलेले वातावरण निवळेल असे वाटले होते. परंतु दुसर्‍या बाजूकडून अपेक्षित असलेला संयम दिसला नाही. आणि मुद्दाम खाजवून काढल्याप्रमाणे धागे -- धागे येत राहिले. (आणि ते उडाले नाहीत). म्हणून प्रायश्चित्त रद्द करून पुनरागमन करीत आहे.
काव्यरस

मिसळपावाची धोरणे सांगण्याचा फायदा

लेखक धनंजय यांनी बुधवार, 14/07/2010 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
झालेली एकूण चर्चा बघता कोणतेही नवीन मुद्दे उपस्थित होत नाहीयेत तेच ते गुर्‍हाळ चालू आहे. बहुतेक सर्व मुद्द्यांचा विचार संपादक मंडळाने आधीच केलेला आहे. आता येणारे प्रतिसाद हे वेगळेच वळण घेत आहेत त्यामुळे इथे लेखात दिलेल्या 'आधिकारिक धोरणांच्या' कलम ९ अनुसार हा धागा आता केवळ वाचनमात्र करण्यात आला आहे. कळावे. -संपादक मंडळ हल्लीच मिसळपावाची आधिकारिक धोरणे प्रसिद्ध झाली आहेत. त्या बाबतीत दोन प्रकारचे मूलभूत प्रश्न काही प्रतिसादकांच्या मनात उद्भवले आहेत.

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.

अधोरेखीत

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 12/07/2010 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमच्या कार्यक्रमातुन स्फुर्ती,प्रेरणा घेउन आम्ही एक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम चालु केला आहे. पण त्यात काही इंग्लिश माध्यमाच्या शिक्षकांचा अभिव्यक्तीचा अहं अधोरेखीत झाल्यामुळे सुसुत्र संचालनाला बाधा येत आहे". अहो, लेले जरा मराठीत बोला.चुपके चुपके मराठीतुन काढला तर स्क्रीप्ट रायटींग तुम्हीच करा. "इगो मॅनेफेस्टेशन." थोडक्यात थेम्स नदीच्या काठी जन्माला आलेले तुमच्या कार्यक्रमात राडे घालतायत. मी उद्या येतो. सगळ्यांना एकत्र बसवा.

जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली.

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 10/07/2010 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
जेम्स लेन ह्याच्या 'शिवाजी - अ हींदु कींग इन इस्लामिक इंडीया' ह्या पुस्तकावरची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली आहे.त्या पुस्तकात शिवप्रेमी मराठी माणसला बोलताना लाज वाटावी अस लिखाण आहे. ज्या मराठीप्रेमी(?) नेत्यांनी 'ह्या पुस्तकाची एकही प्रत विकु देणार नाही' व तत्सम वाक्य मीडीयासमोर बोलली त्यांना एकच सांगु इच्छीतो की तुम्ही कीतीही बोललात तरी पुस्तकाला आधीच ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली आहे.व महाराष्ट्रात आपण कीतीही रोखल तरी 'ऑक्सफर्ड' आपला धंदा चांगला चालवुन घेणार.हे नेते निदान भारतात तरी ह्या पुस्तकाची विक्री होण थांबवु शकतील? सुप्रीम कोर्टाने कोणत्या मुद्दांना विचारात घेउन ही बंदी उठवली आहे? मराठी म

(पारध)

लेखक अवलिया यांनी बुधवार, 30/06/2010 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... भर बाजारात पाध्यांनी फोडलेले थोबाड. वस्ती लेखकांची स्थिरावलेली होती हाव पाध्यांची उफाळलेली होती नशा हो सत्तेची नित्य चढत होती भूक जुगाडाची चाळवलेली होती प्रतिसादांत त्या मैथुनी क्लांतता* नव्हती तरी लाईन तिरकी सर्वच उडवली होती प्रतिसाद डिलीट ही चाल धूर्त होती मैत्रीमधेच "त्या" त्यांची मने गुंतली होती नव्या पाध्यांचे चाळे पुन्हा बहरती जुन्या नानाची ओळख त्यांना नव्हती * असे शब्द असलेले लेख प्रतिसाद उडवले जात नाहीत असे समजल्यावरुन.
काव्यरस

भारतीय टपाल खात्यातर्फे आता नागरिकांसाठी पोस्टल ओळखपत्र

लेखक अरुंधती यांनी रविवार, 27/06/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे. अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्‍याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते.

बैल

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 25/06/2010 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
अहो काय म्हणतोय ते बघाल का? "काय"? ट्रिप ला जातोय. " जाउ दे की" पंधरा हजार मागतोय. "ठीक आहे. देउन टाक" कुठे ते विचारा की? "बर. विचारतो. कुठे"? वर्गातले मित्र आणि मैत्रीणी पण बरोबर आहेत. "ठीक आहे. त्याचे काय? रिझल्ट लागला आहे. मोकळे आहेत. करु दे की काय हवे ते." ज्युनियर मित्र आणि मैत्रीणी आणि पण बरोबर आहेत. "हो का.? बर बर." अहो, दोन प्रोफेसर्स पण बरोबर आहेत. "वा वा वा. चांगले आहे की." अहो ते सर्व खजुराहो ला चालले आहेत. दोन दिवस राहाणार आहेत. "मग त्यात तुला प्रॉब्लेम काय आहे? नविन शिक्षण पद्धतीचा भाग आहे तो. त्याला एक इंग्रजी शब्द आहे खास. तुला सांगितला तर नाही कळायचा.