नमस्कार,
आपण सर्व मिपाकर हे जाणतो की मिसळपाव हे संकेतस्थळ श्री तात्या अभ्यंकर यांनी स्थापन केले आहे. ते या संकेतस्थळाचे मालक सुध्दा आहेत.
गेल्या काही महिण्यांपासून मिपाच्या व्यवस्थापनाकडे तात्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने मी व संपादक मंडळानेच मिपा सुरू ठेवलंय. आता सुध्दा येत्या काही काळ तात्यांना मिपाकडे लक्ष देणे होणार असे दिसत नाही. त्यामुळे तात्यांनी आधी अघोषीत असलेली व्यवस्था घोषीत केलीये की मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार नीलकांत कडे असतील. यात मालकी हक्काबाबत कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे त्याबाबत वर केलेल्या विधानाशिवाय काहीही उल्लेख करने गैरलागू आहे.
माझ्या किंवा तात्याच्या कुठल्याही लेखनामुळे असा कुणाचा गैरसमज झाला असेल तर मी तशी माफी मागतो.
तात्यांचे मिसळपाववर चे स्थान महत्वाचे आहे यात शंका नाही. सध्या फरक एवढाच की रोजच्या कारभारात तसेच इतर विषयांत तात्या लक्ष घालणार नाहीत.
या संदर्भात कुणाला व्यक्तिगत स्पष्टीकरण हवे असल्यास मला मेल टाकावा किंवा व्य. नि. करावा.
- नीलकांत
वाचने
2602
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
कळले हो.
धन्यवाद रे
+१ धन्यवाद
In reply to धन्यवाद रे by विसोबा खेचर
वाह...
In reply to +१ धन्यवाद by अक्षय पुर्णपात्रे
>>Do I contradict
+२
In reply to >>Do I contradict by यशोधरा