रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!
लेखनविषय:
मदनबाणाचा रांगोळी प्रदर्शनाचा धागा पाहिल्यानंतर मलाही इथे धागा टाकण्याचा मोह आवरता येत नाहीये. ;) ठाण्यातल्या न्यु गर्ल्स स्कुलमध्ये रंगावली गृपतर्फे दरवर्षी रांगोळी प्रदर्शन भरवले जाते, ते या वर्षीही भरवले होते. १५ च्या संध्याकाळी चहाबरोबर जोरदार शंकरपाळ्या हादडल्यानंतर भाचेकंपनीला सोबत घेतलं आणि प्रदर्शनात पोहचलो. गणरायाच्या सुरेख रांगोळीने सुरूवात झाली.सध्या घडणार्या विविध घडामोडींना लक्षात ठेऊन एकापेक्षा एक सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पैकी अॅपलचे जनक स्टिव्ह जॉब्स आणि भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह यांच्या रांगोळ्या दृष्ट लागण्याजोग्या होत्या.
- Read more about रंगावली प्रदर्शन - २०१२, ठाणे!
- 48 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
