Skip to main content

छायाचित्रण

हिमालय..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 24/01/2014 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय. त्याचं वेड लागतं. नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं. हिमालय. भव्य हा शब्दही खुजा वाटेल, असं त्याचं रुपडं.

शिव: मूर्तीशास्त्र

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 19/01/2014 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात. लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे.

श्री. अजित कडकडे

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 14/01/2014 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीच्या शताब्दीचे हे वर्ष आहे. या निमित्त्याने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.त्यांच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मला श्री.अजित कडकडे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली.तसेच त्यांना भेटुन २ शब्द बोलण्याची संधी मिळाली.

एक सुखाचा रविवार

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 12/01/2014 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्‍यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात.

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 10/01/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.