Skip to main content

छायाचित्रण

थेकडी ते मुन्नार अणाईरंकाळ मार्गे

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 09/08/2012 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
थेकडीच्या परिसरातील मसाल्याच्या बागा - वेलदोड्याची बाग spice garden, Cardamom plantations हमरस्त्यालगतच्या बंगल्याकडे चढत जाणारा हिरवागार रस्ता greeen road, a road o road-side bungalow रस्त्यांना जणु 'एंजल्स ट्रंपेट्सचे भारदस्त कुंपण

आनंद सागर - शेगाव लई भारी...

लेखक सौरभ उप्स यांनी बुधवार, 08/08/2012 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
नागपूरला काही कामासाठी जायचे ठरले घरच्यांचे, १ दिवसाचं काम होत फक्त पण त्यासाठी २-३ दिवस तरी सुट्टी घ्यावी लागणार होती जाताना मधेच शेगाव लागणार होत, खूप वर्षांनी सगळ्या घरच्यांचं एकमत झाल कि २ दिवस जास्त सुट्टी घेऊन शेगाव दर्शन करायचच यावेळी... प्लान ठरला आणि बुकिंगही आरामात झाल अगदी.... मंदिराच्या आवारात ५ इमारती आहेत भक्त निवासासाठी पण तो दिवस रविवार असल्याने बुकिंगही फुल आणि गर्दीही खूप... खूप चौकशी केल्यावर कळाल कि तिकडे आनंद विहार म्हणून अजून एक भक्त निवास स्थान आहे भक्तांसाठी खास, मंदिराच्या बाजूला असलेल्या निवासस्थानापेक्षा हे खूपच सही आहे.. उत्तम स्वच्छता आणि मनापासून करणारे काम(सेवा)

नाकतोड्याचे प्रोफाईल.

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 05/08/2012 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक हात गळ्यात असल्याने पावसाळा वाया चाललाय.. अशात काल धो धो पावसात एक नाकतोडा घरात घुसला..

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 29/07/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ म्हणजे मराठी माणसाची अस्मिता. राजा शिवछत्रपती न वाचलेले किमान आमच्या पिढीतले तरी कुणी शोधुन सापडणार नाही. लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना मला बाबासाहेबांची राजा शिवछत्रपती ही व्याख्यानमाला ऐकायची संची मिळाली. पहिल्या पुष्पातच सर्व श्रोते अगदी भारावुन गेले होते. त्यावेळी बाबासाहेबही पन्नाशीत होते. तेजस्वी चेहरा, लकाकणारे डोळे आणि आवेशपूर्ण आवाजाच्या या शिवशाहीराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते.

घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect)

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 24/07/2012 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मला माझा कॅमेरा घेउन वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे... जालावर फोटोग्राफी संबंधी विविध लेख वाचायचे आणि त्याचे जमतील तसे प्रयोग करुन पाहावयाचे... सध्या जालावर एचडीआर (High dynamic range) फोटोंची धूम चालु आहे... मी सुद्धा यात सामिल व्हायचे ठरवले,मग काय प्रयोग सुरु. यातला पहिला प्रयोग म्हणजे घोस्ट इफेक्ट ! एचडीआर फोटोग्राफी मधे नको असलेला एक अडथळा... मी याच अडथळ्याचा वापर करायचे ठरवले.माझा एचडीआर फोटोग्राफी एक प्रयोग थोडासा सफल झाला आहे,पण अजुन हवी तशी लोकेशन किंवा सबजेक्ट सापडला नाही...पुढच्या भागात बहुधा मी एचडीआर फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन.... तो पर्यंत तुम्ही घोस्ट इफेक्ट पहा.

आवाज साळुंख्यांचा

लेखक जागु यांनी गुरुवार, 19/07/2012 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवारात बर्‍याच साळुंख्या येतात. त्यांचे सततचे अस्तित्व जाणवुन देत असतो त्यांचा आवाज. त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्यांचे आवाजही वेगवेगळे ऐकू येत असतात. त्यांचा जेंव्हा चांगला मुड असतो, सर्वसामान्य परिस्थितीत असतात तेंव्हा त्यांचा गोड आवाज ऐकू येतो. त्यांचा एक कर्कश्य आवाज निघतो तो साप दिसल्यावर. ह्या साळुंख्या इतकया शुर असतात की साप कुठे दिसला रे दिसला की सापाला धुडकाउन लावण्यासाठी कर्कश्य आवाज करत अगदी त्याला टोचायला जातात. ह्यांच्या जोडीला एखादा कावळाही असतो. आधीच त्याचा आवाज कर्कश्य असतो त्यात अजुन कर्कश्य आवाज तोही काढतो.

सफेद सौंदर्य व सुगंध

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/07/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी मनोगत नाही लिहत ह्या फुलांवर तुम्ही पाहून भावनीक सुगंध अनुभवावा व नेत्रसुख घ्याव ही विनंती. १) निवडूंग (ब्रह्मकमळ) २) जुई