Skip to main content

छायाचित्रण

रांगोळी प्रदर्शन २०१३, ठाणे.

लेखक मदनबाण यांनी रविवार, 03/11/2013 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी गिरगावात रांगोळ्या पाहण्यासाठी जाता आले नाही,मग ठाण्यातल्याच रांगोळ्या पहायचे ठरवले. आज त्या प्रदर्शना मधल्या रांगोळ्या मिपाकरांसाठी देत आहे. *किसन शिंदे यांच्यामुळे नक्की प्रदर्शन कुठे आहे ते कळले त्यामुळे त्यांना इस्प्येशल थांकु.

माझी फिल्म …

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 08/10/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
यस आय'म द चेंज नामक एका राष्ट्रीय फिल्म समारोहासाठी माझा "Dreams Matter" हा लघुपट निवडला गेला होता आणि आज तो मुंबई मध्ये दाखविला गेला. विषय दिल्यावर १०१ तासात फिल्म बनवायची आणि तीही पाच मिनिटा पेक्षा कमी वेळाची अशी बंधने होती. मला विषय दिला होता : People with Special Needs. इथे फिल्म दिली आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. संकल्पना, संपादन, चित्रीकरण मी एकट्यानेच केले.

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक एच्टूओ यांनी सोमवार, 30/09/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

सिरीया (contains some disturbing images)

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे. सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती map असद समर्थक - दमास्कस मध्ये map अमेरिकाविरोधी घोषणा द

मुंबईचे आगळे रूप पाहताना - ३

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 15/08/2013 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे आगळे रूप पाहताना - १ मुंबईचे आगळे रूप पाहताना - २ tower2 आता माझगाव डॉक्स वरून आणखी पलिकडे भायखळा परिसरात व लालबाग परळ कडे बघितले तर सर्वत्र टॉवरच दिसत होते.पैकी डोक्यावर घुमट असलेला टॉवर म्हणजे भायखळयाचा फॉर्च्युन टॉवर आणि मधोमध उभी असलेली उंच इमारत जे जे उड्डाणपूलाच्या अलिकडे मुंबई सेंट्रल कड

महाबलिपुरम

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 12/08/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख कलादालनात टाकावा की जम मध्ये याबद्दल जरा साशंक होतो. अखेर कलादालनात टाकायचे ठरवले कारण लिहिण्यासारखे माझ्याकडे फारसे काही नाही. न मला या इतिहासाबद्दल फारशी माहिती न महाबलिपुरमच्या प्रसिद्धा वास्तुशास्त्राबद्दल. त्यामुळे लिहिण्यासारखे फारसे काही माझ्याकडे नाही. परंतु कलादालनात काही एरर येत असल्याने परत जम मध्ये धागा टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व. पण ही छायाचित्रे बघण्यापुर्वी थोडी माहिती ही हवीच. म्हणुन हा शब्दप्रपंच. महाबलिपुरम किंवा ममल्लपुरम हे भारतातल्या प्राचीन बंदरांपैकी एक.

मुंबईचे आगळे रूप पाहताना - २

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 22/07/2013 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे आगळे रूप पाहताना -१ येथे वाचा revolving मरिन लाईन्स पुलापलिकडे समुद्रालगत थेट समुद्राकडे पाहणाऱ्या मरिन लाईन्स ते चर्चगेट मध्ये असलेल्या बहुतेक रहिवासी इमारतींमधे इन्टरकॉन्टिनेन्टल सहज सामावले होते. पुढची रांग साधारण ४०-६० वर्ष जुन्या ५-७ मजली इमारतींची तर मागे उंचच उंच व्यापारी इमारती.

मुंबईच आगळ रुप पाहताना

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/07/2013 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण मुंबईत एका बांधकाम पूर्णत्वाला आलेल्या इमारतीमध्ये अगदी थेट गच्चीवर जायची संधी मिळाली. मुळात वर जाणे हासुद्धा एक थरारक अनुभव होता - अजुन काम बरेच बाकी असल्याने उद्वाहन कार्यरत झाने नवह्ते. इमारतीच्या बाहेरुन लोखंडी मनोरा बांधुन त्यात तात्पुरते उद्वाहन म्हणजे चक्क एक पिंजरा बसविला होता. एखाद्या हॉटेलच्या बाहेरुन लावलेल्या कॅपसूल लिफ्ट मधुन बाहेर पाहणे वेगळे. इथे फट फट फट फट आवाज करत सरळ्सोट वर चढत जाणार्‍या पिंजर्‍यातुन लहान होत जाणार्‍या इमारती आणि आपण केवळ एका कप्पीवर आहोत ही धास्ती क्षणभर का होईना पण जाणवली.