Skip to main content

छायाचित्रण

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

स्प्लीट टोनिंग ( विषय :- व्यवसाय )

लेखक मदनबाण यांनी रविवार, 07/07/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी कॄष्ण-धवल छायाचित्रण करण्यात मजा येते तसेच याच कॄष्ण-धवल चित्रांना हलक्या रंगाची छटा दिल्यास त्यात अजुन वेगळेपणा देखील आणता येतो... हेच स्प्लीट टोनिंग करण्यामागचा उद्देश असतो.मूळ चित्र आणि चित्रातल्या सावल्या यांना विविध कलरटोन मधे आणल्यास छायाचित्राला एक प्रकारचा वेगळेपणा येतो. मी मात्र संपूर्ण चित्रालाच एकाच टोन मधे ठेवले आहे, फक्त कलरटोन वेगवेगळे वापरले आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा वापरुन पहाच...

भक्ती (छायाचित्रे)

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 06/07/2013 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या गणपतीच्या वेळी 'भक्ती' या विषयावर आधारित काही छायाचित्रे टिपली होती. ती तुम्हा सर्वांस दाखवत आहे, प्रतिक्रीयांचे स्वागत ! 1 2 3 4 5 6 7

सौदी अरेबियातली गारावर्षा...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 30/06/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत आपण सौदी अरेबियातले वाळूचे वादळ… पाहिले; सौदी अरेबियातली बर्फवृष्टी... पाहिली आणि सौदी अरेबियातला पाऊस… पाहिला... आता पाळी आहे सौदी अरेबियातल्या गारपिटीची. कधितरी पण सणकून होणारी ही गारपीट म्हणावी की गारबाँब वर्षाव म्हणावा ??? असा प्रश्न पडतो. बघा तुम्हाला तसं वाटतं का?

सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 26/06/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
अगोदर आपण सौदि अरेबियातले वाळूचे वादळ बघितले... ते जरी भयानक असले तरी अनाकलनीय नव्हते. ते बर्‍याच जणाना आवडले असे दिसले. म्हणून आता एक धक्का अजून द्यावा म्हणतो...

शिलाहारांचा कोप्पेश्वर.......भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/04/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूरचा कोप्पेश्वर: Simple, Free Image and File Hosting at MediaFire या दरवाजातून आत पाऊल टाका आणि हे बघा..........कोप्पेश्वरचे मंदीर. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

काही मोहक रानफुले

लेखक श्रिया यांनी मंगळवार, 02/04/2013 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरू झाला कि आजूबाजूचा परिसर विविध छटांचा हिरवा रंग लेवू लागतो. मग अवचित येतो श्रावण, रिमझिम पाऊस अन उन-पावसाचा लपंडाव घेऊन! विविध रंगांची रानफुले माळरानांत, पठारांवर, डोंगरांच्या कुशीत बहरून येतात आणि मन मोहरून जाते. त्यांच्या आकारांत सुद्धा किती वैविध्य! अगदी नखाएवढी छोटुकलीपण असतात काही फुलं. हा अविष्कार आणि फुलांचा रंगीबेरंगी सोहळा बघण्यासाठी भटकंती करायला मनापासून आवडतं. अगदी खूप लांबच जायला पाहिजे असेच काही नाही. सकाळी लवकर घरातून निघालं आणि एखाद्या जवळच्या घाटरस्त्याची वाट धरली तरी हा बहर बघायला मिळतो.