मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

वाहन पार्श्चभाग लिखाण अर्थात बंपर स्टिकर

पाषाणभेद ·
आता बहूतेक जण म्हणतील की यावर बरेच धागे लिहून झाले, हा फूटकळ धागा आहे, मी आपणाला ओळखत नाही त्यामुळे (निगेटिव्ह का होईना पण) प्रतिक्रीया देणार नाही वैग्रे वैग्रे. तरी पण वाचा आणि आनंद घ्या. असो. रत्याने जातांना वाहनांच्या पार्श्चभागी लिखाण अर्थात बंपर (तसेच) नेम प्लेट, ट्रकचे फाळके, मागील काच, मडगार्ड रबर वर अनेक (महाभागांनी) अनेक तर्‍हेचे लिखाण केलेले असते. अजाणतेपणी आपण त्या कडे बघतो किंवा बघत नाही. काही काही लिखाण मनास भिडते तर काही वेळा मनोरंजन होते. रहदारीच्या वैतागात आपल्याला ते लिखाण नकळत सुखावून जाते. मी खाली काही तसले बघीतलेले लिखाण टाकलेले आहे.

लाजाळू

ॐकार ·
एक बागायतदार होता. एका वर्षी पावसाने झोडपून काढल्याने त्याच्या घरासामोरील एका बागेचे फार नुकसान झाले. त्यामुळे तो बागायतदार फार दु:खी झाला. अनेक वर्षे त्याने स्वतः नवनवीन रोपटी आणून, कलमं करून, खतपाणी घालून ती बाग फुलवली होती. आता आपण परत काही ती बाग फुलवायची नाही असे त्याने ठरवले. पुन्हा असा पाऊस झाला तर पुन्हा असे दु:ख आपल्याला सोसवेल की नाही अशी त्याला चिंता वाटत होती. वर्षभरात त्या बागेतल्या काही रोपट्यांनी आपोआप माना वर केल्या. तग धरून राहिलेली रोपटी पुन्हा तरतरून आली. पण त्या बागेत रान माजल्यासारखे दिसत होते. बागेची काळजी घ्यायला कोणी नव्हते.

विचार करा तडीपार

अजय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माय मराठीची आय-माय कुण्या युपी बिहाऱ्याने काढली तर त्याची पार आपन वाट लावून टाकू बर्का. आता आपल्याच मान्साकडून बोल्लं जातं काईबाई.... काल आमच्या उदव सायेबाचं लेकरू (म्हंजे आदित्य ठाकरे सायेब) म्हने की राजकारनात येयाचं नाई. त्यांनी तर द ड्रीम वुई शेअर अशी शेअर बाजाराला जोडनारी नवी संगटनापन सुरू केली हाये. तीचे मराठीत नाव तुमीच सोदून मिपावर लिवा. त्यांनी आनकी काही तरी सांगीतलं. रोकठोक आनी खनखनीत- "जो विचार करशील, तो तडीपार ने, अशी शिकवण आई-बाबा देतात" (प्रसिद्धी - सकाळ, मुंबई, टुडे पान २) आता बगा आमंचा नवा नेताच ईचार तडीपार करायला सांगतो .

तुम्ही मराठीसाठी काय करता ?

गुळांबा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लेखन प्रेरणा - तुम्ही मराठीसाठी काय करता ? मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो. (पुढिल सर्व कल्पना पुर्णत: काल्पनिक) १) वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतो. २) तिथे लेखनाच्या / प्रतिसादाच्या जिलब्या पाडून मराठीचा वापर वाढवतो. ३) अनेक आयडी काढुन स्वत:च्याच लेखांवर वादग्रस्त प्रतिसाद देतो. ४) विनाकारण एखाद्या सदस्याची बाजु घेवुन इतराना झोडपतो. त्यासाठी ठेवणीतल्या मराठी शब्दांचा वापर करुन अनवट मराठी शब्द जनमानसात रुजवतो.

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

ॐकार ·
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

जपान रिटर्न्ड

सुबक ठेंगणी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाकी काहीही म्हणा पण जपानात राहिल्याचे फायदे आहेत बरं. म्हणजे बघा, जपानहून परत आल्यावर मुंबई किती स्वस्त आहे असं वाटतं; घरांची छतं उंच वाटायला लागतात; रस्ते लांब रुंद वाटायला लागतात; भारतातही रस्त्यांवर सिग्नल असतात ह्याचा साक्षात्कार होतो; आणि रस्त्यावरच्या गाडयांच्या आणि माणसांच्या प्रवाहातून प्रवाशांना लीलया नैयापार लावणा-या बेस्टच्या चालकांचा आणि वाहकांचा प्रचंड अभिमान वाटायला लागतो. पण त्याचबरोबर काही साईड-इफेक्टसही आहेतच.

प्रमाणभाषा? कोंकणी - गोव्यातीत "सुनापरांत" मधील एक लेख

धनंजय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्रातील अनेक लोक गोव्यातल्या कोंकणीला मराठीची बोलीभाषा मानतात. गोव्यात मात्र "आंत्रुजी कोंकणी"ला प्रमाण मानतात. गोव्यातील अन्य बोलीसुद्धा साहित्याच्या योग्यतेच्या आहेत असे म्हणणारा एक लेख मी सुनापरांत मध्ये वाचला - थोडी मजा वाटली म्हणून तो येथे देत आहे. कोंकणीची महाराष्ट्री बोली बोलणार्‍यांना कधीकधी आपली सुशिक्षितांची प्रमाण आंत्रुजी बोली समजण्यास त्रास होतो. म्हणून प्रादेशिक पुणेरी बोलीत अनुवादही देत आहे. :-) मूळ कोंकणीतला लेख एक आठवडाच सुनापरांतच्या संकेतस्थळावर राहातो. म्हणून प्रादेशिक मराठी बोलीतील अनुवादासह मूळ प्रमाण कोंकणीतल्या लेखातले पाठ्यही येथे देत आहे.

संवादाचा सुवावो

भोचक ·
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.