Skip to main content

तुम्ही मराठीसाठी काय करता ?

तुम्ही मराठीसाठी काय करता ?

लेखक गुळांबा
Published on शनीवार, 13/06/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
लेखन प्रेरणा - तुम्ही मराठीसाठी काय करता ? मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो. (पुढिल सर्व कल्पना पुर्णत: काल्पनिक) १) वेगवेगळ्या मराठी संकेतस्थळांचे सदस्यत्व घेतो. २) तिथे लेखनाच्या / प्रतिसादाच्या जिलब्या पाडून मराठीचा वापर वाढवतो. ३) अनेक आयडी काढुन स्वत:च्याच लेखांवर वादग्रस्त प्रतिसाद देतो. ४) विनाकारण एखाद्या सदस्याची बाजु घेवुन इतराना झोडपतो. त्यासाठी ठेवणीतल्या मराठी शब्दांचा वापर करुन अनवट मराठी शब्द जनमानसात रुजवतो. ५) कोणता तरी विचित्र मुद्दा लावुन धरतो. इतर सदस्यांना उबग येईतो त्याचे समर्थन करतो. मग लोक वैतागुन प्रतिवाद करतात. एकुण मराठीचा वापर वाढतो. ६) शुद्धलेखन फाट्यावर मारतो. मग आपोआप आपले लेखन सामान्य जनतेला आपलेसे वाटते. मराठीचा प्रसार होतो. ७) प्रत्येक नव्या सदस्याला सुरवातीला आपल्या कच्छपि लावण्याचा प्रयत्न करतो. तो नाही बधला तर त्याला प्रतिस्पर्ध्याच्या कंपुत ढकलतो. मग त्याला जिकडे तिकडे पायात पाय घालुन पाडतो. ८) फालतु आणि तद्दन बकवास लेखन करतो, काथ्याकुट टाकतो. लोक आणि वैतागाने आणि मग चेष्टा करायच्या उद्देशाने चिक्कार प्रतिसाद टाकतात. तेव्हढीच मायबोलीची सेवा घडते. ९) त्या आपल्याला अजिबात न कळणार्या विषयांवर पाने भरुन प्रतिसाद देतो. १०) ................................. इतरही अनेक गोष्टी मी मराठीच्या विकासासाठी करतो. पण त्या जाहिर लिहिण्याच्या लायकीच्या नसल्याने टिंब टिंब टाकली आहेत. (वरील लेखातील मी हि कोणी एकच व्यक्ती नसुन त्या अनेक व्यक्ती आहेत. त्या कोण ते ज्याने त्याने समजून घ्यावे) ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6510
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

शुद्धलेखन फाट्यावर मारतो. मग आपोआप आपले लेखन सामान्य जनतेला आपलेसे वाटते. मराठीचा प्रसार होतो. खुल्ला काय ते नाव घेवुन बोला. आस आडुन आडुन बोलु नका. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

In reply to by यन्ना _रास्कला

खुल्ला काय ते नाव घेवुन बोला. आस आडुन आडुन बोलु नका. नाव न घेण्यानं पण लोक दुखावतात. नाव घेतलं तर जगबुडी होईल बापु. पण असले आचरट प्रकार थांबावेत असे मनापासुन वाटते म्हणुन आज नाईलाजानं लिहितोय.

वरील लेखातील मी हि कोणी एकच व्यक्ती नसुन त्या अनेक व्यक्ती आहेत. त्या कोण ते ज्याने त्याने समजून घ्यावे) :S चुचु

"तुम्ही मराठीसाठी काय करता ? " अशा आषयांचे काथ्याकुट पाडतो !!!! यावर चर्चा होउन मराठी चर्चा पुढे जाते आणि मराठी माणूस जागेवरच रहातो - टारांबा

In reply to by टारझन

"तुम्ही मराठीसाठी काय करता ? " अशा आषयांचे काथ्याकुट पाडतो !!!! मी तर "जनातलं मनातलं" या सदरात लिहिलेलं आहे. :) मराठी चर्चा पुढे जाते हि मराठी चर्चा काय भानगड आहे? :-/

आम्ही मराठीसाठी काहि करत नाही. ती मराठी आहे ना ती स्वतःला फार शहाणी समजते आणी स्वतःच्या अगम्य भाषेत काय काय बडबड करते. त्यात आज लेख लिहिल्यापासुन तर ती हवेतच आहे. हुह !! º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

~X( अरे ती मराठे ! =)) हे मराठीविषयी विचारत आहेत :P --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

मराठे नावाच्या मुलाचा राग आला की तो = मराठ्या मराठे नावाच्या मुलीचा राग आला तर ती = मराठी कळले का नॅन्स ? Now U Understood ? Hell ! º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

वा रे पराठ्या !!! =)) =)) =)) =)) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

कळले का नॅन्स ? Now U Understood ? Hell !
how cheap english , you people don't know how to speak english. That is such a low ! Raj Kumar , better you go and learn some english !! U understood ? Raje will understand it anyways =)) ~ फालुदा

In reply to by परिकथेतील राजकुमार

वा रे पराठ्या !!! =)) =)) =)) =)) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

आम्ही रोज जेवताना साखरांबा न खाता (कारण साखर परदेशी ) गुळांबा खातो(जो मराठी घरांत पूर्वी जास्त वापरत). असे करुन आम्ही केवळ मराठीसाठीच नाही तर देशासाठीही काही करतो. मेथांब्याला स्पर्शही करत नाही. मुंबईत वावरताना चुकुनही मराठी बोलत नाही, उलट आपण हिंदी भाषिक आहोत असे भासवून इतर, मराठी लोकांविषयी काय बोलतात ते गनिमीकाव्याने ऐकतो आणि कोणी वाईट बोलत असेल तर त्यांची 'राजसाहेबांकडे' कागाळी करतो. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

असे धागे काढत नाही.

मी माझे सर्व 'व्यवहार' मराठीतुन करतो.

मी ए. टी. म. मध्ये सुद्धा मराठीच वापरतो.

In reply to by प्रशु

त्याने मराठीचं संवर्धन कसं होतं? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

अनेक आयडी काढुन स्वत:च्याच लेखांवर वादग्रस्त प्रतिसाद देतो. जस्त करुन (कोक्नी) बायकांच आयडी का? :-/ चुन्ना _चास्क्ला */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

तुम्ही मराठीसाठी काय करता ? कुणी मराठीसाठी काही करताना दिसला की त्याच्या तंगड्या खेचतो, त्याने आम्ही मराठी आहोत हे सिद्ध होते. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

५) कोणता तरी विचित्र मुद्दा लावुन धरतो. इतर सदस्यांना उबग येईतो त्याचे समर्थन करतो. मग लोक वैतागुन प्रतिवाद करतात. एकुण मराठीचा वापर वाढतो. ६) शुद्धलेखन फाट्यावर मारतो. मग आपोआप आपले लेखन सामान्य जनतेला आपलेसे वाटते. मराठीचा प्रसार होतो. फालतु आणि तद्दन बकवास लेखन करतो, मी वरील तीन गोष्टी करतो..! :) तात्या.

मराठीतुन शिव्या मारतो हा हा हाहा

टेलिमार्केटिंग वाल्यांशी मराठित बोलतो