माय मराठीची आय-माय कुण्या युपी बिहाऱ्याने काढली तर त्याची पार आपन वाट लावून टाकू बर्का.
आता आपल्याच मान्साकडून बोल्लं जातं काईबाई....
काल आमच्या उदव सायेबाचं लेकरू (म्हंजे आदित्य ठाकरे सायेब) म्हने की राजकारनात येयाचं नाई.
त्यांनी तर द ड्रीम वुई शेअर अशी शेअर बाजाराला जोडनारी नवी संगटनापन सुरू केली हाये. तीचे मराठीत नाव तुमीच सोदून मिपावर लिवा. त्यांनी आनकी काही तरी सांगीतलं. रोकठोक आनी खनखनीत-
"जो विचार करशील, तो तडीपार ने, अशी शिकवण आई-बाबा देतात" (प्रसिद्धी - सकाळ, मुंबई, टुडे पान २)
आता बगा आमंचा नवा नेताच ईचार तडीपार करायला सांगतो .