मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरंगुळा

फाईल बंद

रम्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गोव्याचा अथांग समुद्र, निळेशार पाणी आणि पांढरी शुभ्र वाळू. आजुबाजुला नारळी फोपळीच्या बागा, समुद्रावरून येणारा ताजा वारा. अशा छान वातावरणात पोलिस सब-इन्स्पेक्टर पाटील बायकोच्या कमरेत हात घालून, गालाला गाल चिकटवून, प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत सेल्फी काढत होते. बायको सुद्धा फारच रंगात आली होती. लग्नानंतर पहिल्यांदाच नवरा असा तिच्या हातात आला होता. दोघांचेही कुठे म्हणजे कुठेच लक्ष नव्हते. ते दिवस, तो सहवास संपूच नये असे वाटत होते. फक्त तू आणि मी, मी आणि तू. माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी. दुसरा कोणताच विचार मनात नव्हता आणि तो असण्याचे कारणही नव्हते. फौजदार फार तयारीने आले होते.

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

मस्त जुळतं आमचं!

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मस्त जुळतं आमचं! तीच ते नाजूक हसने… ब्रेकफास्टवेळी टेबलावर हसून चांदणे सांडणे, सगळं काही नजरेत साठवले मी! तिची ती उंची, गोरापान रंग, बोलण्याचा ढंग— अप्सराच जणू! फिदा झालो मी तिच्यावर… तिचे ते मोकळे केस, स्टायलिश राहणे, इंग्लिश बोलणे— अहाहा! मला दाढी ठेव सुचवणे, हेअरस्टाईल बदलायला लावणे, “फॉर्मलपेक्षा कॅज्युअलवर छान दिसशील” सांगणे… कसला संकेत? सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळची कॉफी— आम्हाला एकमेकांची सवयच झालीय! टीम्स मिटिंग असो की एखादा इवेंट, आमचे लाडिक विनोद सुरूच असतात. मागे मला मिळालेले गिफ्टही मी तिला देऊन आनंदी केले. ऑफिस कलीग हा फक्त आमच्यातला अडसर आहे,

बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो! मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल. आकृती १ - पुढील आलेखात निळ्या बाणाने दाखवलेली मेणबत्ती काल संपलेल्या आठवड्याची आहे. ही मेणबत्ती काय दाखवते? मार्केट निश्चित्पणे वर पण गेले नाही आणि फार खाली पण गेले नाही, म्हणजे अनिश्चित राहिले.

नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली. काय नाहीये माझ्या पाच शशकांत? माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल.

बजेट आले आणि लग्न तुटले.

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले. ग्राऊंड फ्लोर वर एक मोठा हॉल, दोन बेड रूम, मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर पाहुण्यासाठी एक रूम ही. घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती.

अपघात टळला तो प्रवास

पराग१२२६३ ·
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

दहीभात...

किल्लेदार ·
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.