विरंगुळा
तरच मग कविता कर...
जपून वापर जरा शब्द
करू नकोस उधळमाधळ
उडून जातील कस्पटासमान
घोंगावेल टीकेचे वादळ
मनातल्या प्रतिमांना
ओत साच्यात जरा जपून
झिजत चाललेत कंगोरे
तीच तीच कविता करून
निसर्गाची हाक तशी
अधूनमधून कानी येते
सतत बोलावणे आले तर
औषध घेणे भाग पडते
तसे तुझे होऊ नये
म्हणून सांगतो दम धर
फारच दाटून आले असेल
तरच मग कविता कर
अत्त्यावश्यक सूचना -
१. फारच दाटून आल्याने हे विनोदी शीघ्रकाव्य केले आहे. तेंव्हा ह.घ्या.
२. कविता विनोदी आहे हे सांगितले आहेच. तेंव्हा जमेल तेवढे हसावे ही विनंती.
३. माझ्या यापुढील कवितांना याच कवितेतील ओळी फेकून मारू नयेत.:):)
संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ
सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.)
संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले.
या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते.
मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक - एक अस्सल लेख
चित्तर यांचा 'मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक' हा लेख वाचून आमची संतापाने लाही लाही झाली आहे. एकतर अशा लेखाची मूळ कल्पना आमची. त्यात तात्या अभ्यंकरानी गडबडीने या विषयावर लिखाण केले तेंव्हा आम्ही कसेबसे शांत बसलो पण आता या मूषकदौडीत चित्तर हेही उतरले, एवढेच नव्हे तर या विषयावर आपलेही लिखाण सुरु आहे अशी सर्किट यांनी धमकी दिल्याने आम्हाला हा आक्रमक पवित्रा घेऊन या विषयावरील प्रताधिकार सिद्ध करण्यासाठी हा लेख लिहिणे भाग पडत आहे. (सर्किट यांनी आता सन्जोप राव यांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःची 'शैली' निर्माण करणे आवश्यक झाले आहे.
मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात.
तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.
शायरे आज़म
दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. कुठे काही अडखळले तर जरूर विचारा..
शायरे आज़म
कल इक अदीबो-शायर व नाक़िद मिले हमें
कहने लगे की आओ ज़रा बहस ही करें
करने लगे बहस की अब हिंदो-पाक में
वो कौन है के शायरे-आज़म जिसे कहें
मैंने कहा 'जिगर'! तो कहा डेड हो चुके!
मैंने कहा के 'जोश'! कहा, क़द्र खो चुके
मैंने कहा 'फ़िराक़' की अज़मत का तबसरा!
बोले 'फ़िराक़' शायरे-आज़म!
Taxonomy upgrade extras
चला कथा लिहू या
मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते.
आपल्याकडे अतिशय प्रतिभावान साहित्यिक आहेत. चला आता सर्वजण मिळून एक कथा लिहूया.
१. प्रत्येक प्रतिसादकर्त्याला एक परिच्छेद लिहिण्याची परवानगी आहे.
२. परिच्छेद शक्यतो दहा ओळींपेक्षा जास्त नसावा
३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत.
अशी साधारण मार्गदर्शक तत्त्वे.
चला तर मग.
मराठी अंताक्षरी
चला मराठी अंताक्षरी खेळूया!
आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु
हरी पाहिला रे हरी पाहिला रे
र.
मुखडा-अंतरा
हा खेळ असा आहे की गाण्याच्या अंतऱ्यावरून त्या गाण्याचा मुखडा ओळखणे. यात आपण हिंदी गाणी घेऊ कारण हिंदी गाणी सर्वांना बरीच माहिती असतात. मराठीपण चालतील. जे कोणी गाण्याचा मुखडा ओळखेल तिने/त्याने दुसऱ्या गाण्याचा अंतरा द्यायचा. गाणे ओळखता आले नाही तर अर्थातच clue देणे.
तर मग सुरवात करूया का?
बागोमें फुलोंके खिलनेसे पहेले, तेरे मेरे नैनोंके मिलनेसे पहेले
हे पहिले गाणे सोपे आहे म्हणून एकच ओळ दिली आहे. गाण्याचा अतरा मधे २-४ ओळि असल्या तर जास्त बरे होइल, गाणे जुने/नवीन माहिती नसेल तर त्याकरता ४ ओळी
मिसळपाव