Skip to main content

विरंगुळा

साधी सुकी भेळ

लेखक हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर यांनी गुरुवार, 26/02/2026 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक भेळ आहे. रामण्णा बुट्टी भेळ. एका (प्लास्टिकच्या) बुट्टीत तिघा चौघांना पुरेल असा चिवडा, पातीचा कांदा, शेंगदाणे, कोथमीर, थोडं नावापुरतं फरसाण आणि मटकी शिजवून अशी भेळ देतात. वरून एक आक्खा कांदा आणि हिरव्या मिरच्या. बास. हिला मटकी भेळ असेही म्हणतात. यात चिंचेचा कोळ गूळ वगैरे काही नसते. चिवडा देखील आपले लांबडे मुरमुरे हळदीत आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेले. आमचा आज्जा कधीतरी असे चिरमुरे फरसाण घरी घेऊन यायचा.

दरम्यान

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 24/02/2026 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
गच्चीवर असाच पडलो होतो. चांदणं बघत. वाऱ्याबरोबर धूळही उडत असल्याने तंद्रीभंग व्हायचा. इतक्या प्रचंड आकाशाच्या पोकळीत तारे तरी किती. भिती वाटेल एवढे भयंकर हे आकाश. चंद्राकडे कधी टक लावून बघीतलेय? चटईवरुन उठून ग्लासातलं पाणी पिलो. आजूबाजूला नजर मारली. एक सुन्न शांतता अंधारात गडद होऊन मिसळली होती. किती वाजले असतील ? माहीत नाही. अचानक जाग आली आणि मी असा. झोपायचा वायफळ प्रयत्न केला. मग डोळे सताड उघडे ठेवून चंद्राकडे बघत बसलो. चंद्र कधी कधी तांबूस वाटतो. नीट बघितलं तर तिथे माणसं राहत असतील असंही वाटतं. अचानक तो मोठा झाल्याचा भास झाला. आता तो सरळ खाली येऊन आपटणार. मला घाम फुटतो.

दोसतारः शाळेत लग्न लागते २

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 22/02/2026 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी वर्गात सर उभे असतात मुले बाकावर बसलेली असतात. आज सर खुर्चीत बसलेले होते आणि आम्ही उभे होतो. फळा असलेली भिंत जरा इकडे सरकवली असती तर आम्ही सगळ्यानी शिकवायला सुरवात केली असती. हा विचार मनात येतोय तोच शाळा सुटल्याची घंटा होते. आम्ही तसेही उभेच होतो. आणि दप्तरेही आवरलेलीच होती. सगळ्यानीच न ठरवता दप्तरे उचलली आणि पटकन वर्गाबाहेर धूम ठोकली , सरांच्या अगोदर.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53531 इतके कंटाळलो होतो की रोजच्यासारखे जित्या बोलावत असतानाही ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलो नाही.

दोसतारः शाळेत लग्न लागते (१)

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 20/02/2026 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्‍या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही. कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्‍याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्‍याची चटणी तरी हवीच. पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा.

आणि माऊंट किनाबालू सर झाला...

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 20/02/2026 15:57 या दिवशी प्रकाशित केले.

माउंट किनाबालू, ईस्ट मलेशिया ह्या बेटावरील (बोर्निओ आयलंड) साबा ह्या राज्यातला, मलेशियातील आणि साऊथ ईस्ट आशियातील सर्वात उंच पर्वत आहे. आणि, जगातील बेटांवर असलेल्या पर्वतांमध्ये जगात तिसऱ्या नंबरचा उंच पर्वत; ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4095 मीटर आहे. गिर्यारोहकांमध्ये चढाई करण्यासाठीचं एक मानाचं नाव आहे माउंट किनाबालू (स्थानिक भाषेत गुनुंग किनाबालू) .

सैरभैर डायरी - २.१

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 05/01/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

५- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/12/2025 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंठरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53387 मला डोहाळ्यांचा त्रास व्हायला लागला. काहीही खाल्ले की पोटात टिकत नाही. कसली कसली स्वप्ने पडायला लागली.

४- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 26/12/2025 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठराव अगोदरच कुठेतरी निघून गेले होते. सासुबाईंनी ओठावर लावायला सायीची वाटी दिली. म्हणल्या हे लाव.तोंडावर. आणि सगळं आवरून मगच ये बाहेर. भरल्या घरात असलं रडव्या तोंडाने नांदायचे नसते. लक्ष्मी बाहेर निघून जाते अशाने. क्रमशः मागील दुवा : https://www.misalpav.com/node/53386 खूप गदगदून रडायचे होते पण गळ्यातले त्राणच संपून गेले होते. त्या दिवशी तशीच पडून राहिले. खाण्यापिण्याचीही वासना हरवली होती. संध्याकाळी सासूबाई नी जवळ घेतले. माझ्या पाठीवरून तोंडावरून हात फिरवला. मला माई आठवली. मला कुठे दुखले खुपले की ती ही असेच करायचे.

३- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 26/12/2025 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
तोच विचार होता अगोदर. आणि तेच केलं असते पण वैकुंठरावाना गोपीकाबाई च आवडल्या . त्यामुळे यावं लागलं इकडे. आतोबा हसतात. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53380 अगे कौसल्ये असे कसे म्हणतेस. समोरून चालून स्थळ आलंय तर नको का म्हणतेस. दुर्गा आज्ज्जी आता या बोलण्यात पुढे आली. जोडा कसा राम सीतेसारखा शोभेल. मला कळतंच नव्हते काय चाललंय ते. जोडा आणि सोयरीक हे दोन नवीन शब्द माहीत झाले इतकेच. बैलजोडी माहीत होती. पण जोडा हे काहितरी नवीनच. घरात का ठेवणार आहेस. मुलीला, मी या वयाची होते तेंव्हा सासूबाईच्या हाताखाली स्वयंपाक शिकत होते.

तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....( २)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/12/2025 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
अर्ध्या तासापूर्वी झालेल्या त्या सगळ्या मरणप्राय प्रसव वेदनांचा विसर पडला तोंडाचे बोळके दाखवणार्‍या निष्पाप हसण्याने. जणू माझाच जन्म झाला असावा असे वाटले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. अनहद असा एक नाद असतो म्हणे. देवांच्या वाद्यांचा. कशावरही आघात न करता हा नाद होतो. तसा नाद कुठेतरी उमटला. तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण
क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53375 स्पर्षाचे गारूड म्हणायचे की की त्या निष्पाप हसण्याचे. ज्याच्या कडून कसलीही अपेक्षा नाही.