उण्यापुऱ्या ६०-७०-८० वर्षांचं आयुष्य आपलं. त्यातही जवळजवळ १/३ झोपेतच जाते. बाकी तर हिशोब सोडूनच द्या. जेव्हा पहिल्यांदा समज येते बहुतेकजण शाळेतच असतात. काही लोक कदाचित कॉलेज मध्ये वा पन्नाशीतही असू शकतात तो भाग निराळा !
त्या वयात मौज मजा म्हणजे काय हो मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळणे, हातगाडीवर मिळणारे आइस्क्रीम खाणे, कधी मिळालेच तर रेस्टॉरंट मध्ये वडिलांसोबत जाऊन मसाला डोसा खाणे बस ! पण नाही एवढ्या साध्या गोष्टीचे पण काही परिणाम असू शकतात नाही का? दहावी / बोर्ड वगैरे राक्षस पण असतातच मानगुटीवर बसलेले. एकदा दहावी होऊ दे रे मग काय कॉलेज मध्ये कर जेवढी मौजमजा करायची ते.