Skip to main content

विरंगुळा

शशक - भूल भुलैय्या २

लेखक तर्कवादी यांनी गुरुवार, 16/06/2022 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
तिला पटत नव्हतं तरी आमच्या दोघांच्या अधिक चांगल्या भविष्यासाठी मला तिथे जायचं होतं. अवघड प्रवासानंतर मी तिथे पोहोचलो. ती गाणं ऐकत होती "कसे सांगू " ? ती धावत मला बिलगली. "आता पुन्हा जायचं नाहीस." क्षणार्धात तिनं माझ्या हातातलं मशीन बाल्कनीतून भिरकावून दिलं "मूर्ख झालीस का ?" तिच्यासोबत मला आता रहायचं नव्हतं. " इतकी वर्षे मी तुझीच वाट पाहिली , तुझ्यावरच प्रेम केलं. आता वयस्कर झालेली मी तुला नकोय ?" तिच्या डोळ्यात पाणी होतं. " . . . . " " तु गेल्यावर मी एकटीनेच घर चालवलं. तुझी संपत्ती आणि विम्याची रक्कम मला मिळाली; पण सात वर्षानंतर..

बहारो फूल बरसाओ....

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 15/06/2022 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
बहारो फूल बरसाओ मेरा महेबूब आया है...... हिंदी सिनेमातलं हे गाणे जणू खास बँडवाल्यांसाठे मुद्दाम होउन लिहीले असावे असेच वाटते. मला तर लहानपणी हे गाणे सिनेमातले नसून लग्नातले आहे असेच वाटायचे. लहानपणे म्हणे टीव्हीवर एकदा हे गाणे लागले होते तेंव्हा मी आईला विचारले होते की "आई या गाण्यात बँडवाले कुठे आहेत? वरात कुठे आहे. काहीतरी चुकतय." माझा प्रश्न ऐकून घरातले सगळे खो खो हसत सुटले होते. तो एक किस्साच होऊन बसला होता. कोणतेही लग्न असले आणि त्यात हे गाणे वाजू लागले की सगळे इतर कुठे पहायच्या ऐवजी माझ्याकडेच पहायला लागतात. इतक्या वर्षांनंतरही.

पुनर्जन्म

लेखक पाटिल यांनी सोमवार, 06/06/2022 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
पुनर्जन्माचं तसं काय फिक्स नसतंय. किती टाईम लागेल काय सांगता येत नाय..! म्हणजे असं बघा की जुनी गोष्ट आहे..! साधारण दोनेक हजार वर्षें झाली असतील...! तेव्हा आपल्या भागात सातवाहन वगैरेंचं राज्य होतं.. त्यांची एक राजकन्या होती.. आणि मला ती आवडायची. अर्थात, माझ्यासारख्या हजारो फाटक्या मनुष्यांना ती आवडत असणार हे साहजिकच आहे.. आणि हे तिच्या खिजगणतीतही नसणार, हे ही स्वाभाविकच म्हणावे लागेल.!

शशक का चषक

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 03/06/2022 05:24 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक बिचारा....... "तुम्ही मुलखाचे वेंधळेआहात, काहीच कसं जमत नाही हो तुम्हाला", इत्यादी विशेषणे त्याच्या पाचवीला पुजलेली. अर्थात हे त्याच्या पत्नीचे मत. हे काही नवीन नव्हते.लहानपणा पासूनच याची सवय होती त्याला. आई वडिलांच्या लेखी तो एक सामान्य मुलगा. शिक्षक सुद्धा, "तु राहू दे ,तुला जमणार नाही", एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचे उदाहरण देत "काहीतरी शिका",आसा टोमणा मारायचे. पुढे कशीबशी एक नोकरी मीळाली. कार्यालयात काहीच वेगळे घडले नाही.नोकरी म्हणून छोकरी. आयुष्यात तो एकच दिवस ,ज्या दिवशी लोकांच्या मते "सर्व अवगुणसंपन्न", असा तो "सर्व गुणसपंन्न" म्हणून ओळखला गेला.

माझी राधा - ९ ( अंतीम )

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 31/05/2022 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
बाहेरच्या अंधाराला सकाळच्या धुक्याची जोड आहे. वातावरण अधीकच गहिरे झालंय. अशा वेळेस आपल्या एकटेपणाची जाणीव जास्तच होते. पैंजणाच्या घुंघरांचा आवाज येतो. मी चमकून समोर पहातो. समोरच्या धुक्यातून एक आकृती जवळ येताना दिसते. मी सावध होतो. हात मंचकाशेजारी ठेवलेल्या खड्गाकडे जातो. पण तो तेथपर्यंत पोहोचत नाही. मधेच थांबतो. धुक्यातून येणारी आकृती म्हणजे तू आहेस. हे जाणवताच मी थबकतो मागील दुवा : माझी राधा -८ http://misalpav.com/node/50263 राधा ? आत्ता..... या इथे..... की मग आणखी कोण ? राजाला त्याच्या अंगी जात्याच सावधपणा ठेवावा लागतो.

माझी राधा - ८

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 23/05/2022 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
कसली तरी बाधा झाली आहे म्हणे तीला, गोवर्धन पर्वताच्या वाटेवर एक आश्रम आहे. तिथले आचार्य यावर उतारा देतात तिकडे न्यायचे आहे एकदा तीला." लोक असे काहीबाही बोलत होते. पण ते तुझ्या कानावरच येत नव्हते. आणि मग तो दिवस आला. मागील दुवा माझी राधा http://misalpav.com/node/50243 एक दिवस ,मथुरेहून दूत एक निरोप घेऊन आला. मथुरेत युवक दिनाचा उत्सव होता. त्यासाठी येण्याचे आमंत्रण होते. त्यात मल्ल युद्धाचे सामने देखील होते. युवादिनाचे म्हणून खास मला आणि बलरामदादाला उत्सवाचे निमंत्रण होते.

माझी राधा - ७

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/05/2022 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
त्या क्षणी तुझ्या चेहेर्यावर खूप काही बदल घडत जातात. आभाळ भरून यावे तसे तुझे ते टप्पोरे डोळे भरून येतात. तुझ्या तोंडून हुंदका फुटत नाही इतकेच. तू कसबसे स्वतःला सावरलंस. आणि तुझ्या हातातले मोरपीस माझ्या हातावर फिरवत म्हणालीस ' मी ते मोरपीस आहे असे समज." तुझ्या शब्दांचे अर्थ समजण्याचे वय नव्हते ते माझे. पण ते कुठेतरी आत खोलवर भिडले. मी नि:शब्द झालो मागील दुवा http://misalpav.com/node/50189 माझ्या हाताला घट्ट धरून जवळजवळ ओढतच तू मला नंदवाड्यात घेऊन गेलीस. माय अंगणात माझी वाटच पहात बसली होती. मला पहाताच ती पुढे आली.

50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 15/05/2022 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत. विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली.

कथा : आमची गोष्ट

लेखक चष्मेबद्दूर यांनी शनिवार, 14/05/2022 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
शबिना: मी शबिना, माझ्या पोस्ट ग्रॅडच्या शेवटच्या वर्षात प्रेमात पडले मी आनंदच्या. आमच्या कॉलेजच गॅदरिंग बघायला आला होता, आमची ओळख वाढली आणि त्यानी लग्नाचं विचारल्यावर मी होकार देऊन टाकला. तो जोशी, मी तांबोळी! आमच्या पुढचा रस्ता काही फार सहज सोपा नसणार हे ठाऊक असून देखिल आम्ही सगळं निभवायच ठरवलं. माझ्या सासरी, आमचं लग्न म्हणजे एक मोठा धक्काच होता. त्यांच्या घरी माझ्या हातच पाणी देखील चालेल की नाही असं त्यांच्या वागण्या बोलण्यातून वाटत रहायचं. लग्नाआधीच्या दोन वर्षात फार वेळा नाही गेले मी त्यांच्याकडे, पण मनापासून कधी स्वागत नाही झालं माझं हेही तितकंच खरं. ते राहायचे शहराच्या मध्यवर्ती भागात.

तिसरी कसम

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 13/05/2022 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
तिसरी कसम "गळाकाटू वकी$$$$ल '',शिपायाने केलेली पुकार ऐकून डायसवर बसलेल्या काटे एकदम चमकले. काय आडनावं आहे!चित्र विचित्र आडनावं सगळीकडेच असतात.पण इकडे विदर्भात वेगळीच त-हा आहे. गिडमिडे,किडमिडे,बुडबुडे,लुकतुके,किरकिरे, एकवेळ ठीक.पण मानकापे,नाकमोडे,गळाकाटू,हाततोडे, पायमोडे अशी,डोक्यापासून पायापर्यंत शरीराचे विविध अवयवांचा छेद करणारी आडनावे,भयंकरच आहेत.रोज नववीन ऐकायला मिळतात.आडनावांची निर्मिती या विषयावर संशोधन करून पुस्तक लिहीता येईल असा क्षणिक विचार त्यांच्या मनात आला.त्यांना हसू आले .पण समोरच्या फायलीत तोड घालून मोठ्या कष्टाने त्यांनी ते लपवले.साहेब आडनावाला हसले हे वकीलांना कळले तर भानगड व्ह