Skip to main content

विरंगुळा

Silver Trumpet and Trumpet Banner

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 07/11/2022 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
ऱाष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली.

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 05/11/2022 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.

अमू- OTT सिनेमा

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 04/11/2022 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं. एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ‌ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत ‌असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते. हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्

दिवाळी विशेष – भायखळ्याचं स्टेशन

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 23/10/2022 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
Byculla यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.

माझिया मनाला ( कथा )

लेखक चष्मेबद्दूर यांनी मंगळवार, 18/10/2022 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.

माझिया मनाला ( कथा )

लेखक चष्मेबद्दूर यांनी मंगळवार, 18/10/2022 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.

खरचं गरज आहे का?

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 26/09/2022 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला पेरणा एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या. मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस.

हाडाचा सापळा (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 24/09/2022 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
हाडाचा सापळा (गूढकथा) काही घटना एकदम अनपेक्षितपणे घडतात. पण खरोखर त्या अनपेक्षित असतात का? की त्या विधिलिखित असतात. आगोदरच त्या निश्चित झालेल्या असतात. तुम्ही केवळ त्या घटनांचे एक वाहक असता. किंवा मग नाममात्र साक्षीदार असता. कदाचित तसेही असू शकेल.      मी हे असे का म्हणतोय, त्यालाही कारण आहे. एक तार्किक स्पष्टीकरण आहे. ते स्पष्टीकरण समजून घेण्याईतपत मी समंजस नसेलही, पण त्या स्पष्टीकरणाच्या जाणिवा मात्र मला तीव्रपणे जाणवायच्या. त्या माझ्या अगदी अंगावर यायच्या. हे जे काही सगळे घडले, ते माझ्याच सोबत का घडले, याचे भले माझ्याजवळ उत्तर नाही. पण ते माझ्यासोबत घडले होते.

दिंडी (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी रविवार, 18/09/2022 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.