Skip to main content

विरंगुळा

विरंगुळा — मनोरंजन आणि हलक्याफुलक्या मराठी लेखनाचा विभाग. विनोदी किस्से, गमतीजमती आणि विरंगुळा देणारे मराठी साहित्य येथे वाचा.

अनंत चतुर्दशी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 09/09/2022 23:32 या दिवशी प्रकाशित केले.

आज अनंत चतुर्दशी.दूरदर्शनवर गणपती विसर्जन व मिरवणुकीची दृश्ये दाखवत होते.लालबागचा राजा,कसबा गणपती, नागपूरचा राजा,कधी नाशिक कधी नागपूर शहरातली दृश्ये ,जणू दूरदर्शन संजय आणी मी धृतराष्ट्र.

जसे वय वाढते तसे येणारा प्रत्येक दिवस भूतकाळात जरूर घेऊन जातो. तसाच आजचा दिवस सुद्धा....

एक दोन तीन चार ....
माणिक मोती बडे हुशार....

आईस्क्रीम!

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 07/09/2022 09:45 या दिवशी प्रकाशित केले.

उण्यापुऱ्या ६०-७०-८० वर्षांचं आयुष्य आपलं. त्यातही जवळजवळ १/३ झोपेतच जाते. बाकी तर हिशोब सोडूनच द्या. जेव्हा पहिल्यांदा समज येते बहुतेकजण शाळेतच असतात. काही लोक कदाचित कॉलेज मध्ये वा पन्नाशीतही असू शकतात तो भाग निराळा !

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं.
कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले...
X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.
नारायण धारप यांनी युगपुरुष ही खिळवून टाकणारी विज्ञान कथा १९७० मध्ये प्रकाशित केली.

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 30/08/2022 19:03 या दिवशी प्रकाशित केले.

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट. परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही MX Player वर 'Day Of The Mummy (Hindi Dubbed)' हा हॉरर चित्रपट लावला होता. सुरु झाल्यावर सुमारे साडे दहाव्या मिनिटापासून एका पात्राने लावलेल्या चष्म्यातील छुप्या कॅमेरातून दिसणारी दृष्ये चित्रपट रूपाने प्रेक्षकांसमोर पेश करण्याची लेखक/पटकथा लेखक किंवा दिग्दर्शकाच्या दृष्टीने 'अभिनव' पण बघणाऱ्याच्या दृष्टीने अत्यंत वैतागवाणी कल्पना राबवलेला आणि एकही ओळखीचा कलाकार नसलेला असा हा तथाकथित 'हॉरर' सिनेमा तब्बल ४०-४५ मिनिटे उलटल्यावरही काहीच उत्कंठाजनक घटना घडत नसल्याने कंटाळून बंद केला. दुसरा एखादा बघू म्हणून 'शिंडलर्स लिस्ट…

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 21/08/2022 19:27 या दिवशी प्रकाशित केले.

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२
मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी.

ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला.

मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते.

नर बळी

लेखक देवू यांनी गुरुवार, 18/08/2022 17:23 या दिवशी प्रकाशित केले.

ह्या वाक्यातील क्रियापद कोण सांगू शकेल?
अख्ख्या वर्गाने हात वर केले , फक्त मी सोडून.
उत्तर येत नसले तरी सर्वांबरोबर आपणही हात वर केल्यास आपल्याला विचारण्याची शक्यता कमी होत असल्याने बरेच जण तसे करायचे. मी हात वर न केल्याने मला बाई नक्कीच उत्तर देण्यासाठी विचारतील ह्याची खात्री होती. त्याला कारणही तसेच होते.

मी कुठलेही मराठी व्याकरण न शिकता बालवाडीची मुलाखत मराठीत देऊन प्रवेश मिळवला होता. सगळं काही सुरळीत चालू होते, परंतु पुढे वरच्या वर्गात ह्या मातृभाषेच्या व्याकरणाने मला " दे माय धरणी ठाय " करून सोडले.

टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 12/08/2022 12:06 या दिवशी प्रकाशित केले.

"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना!

पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का!

ब्रह्मानंदी

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 30/07/2022 12:35 या दिवशी प्रकाशित केले.

इ. स. १८५९-६० सालची चिपळूण मधली सकाळ,कदाचीत पावसाळी असावी.

रंगो भट नुकतेच पुजा अर्चना करून पडवितल्या लाकडी झोपाळ्यावर सुपारी कातरत बसले होते. आडकित्याच्या आवाजात झोपाळ्याचा 'कर्र ~, ~कर्र' आसा लयबद्ध आवाज मीसळून नादब्रह्म निर्माण होत होते. रंगो भटाच्या संजाबा वरची शेंडी प्रशिक्षीत नर्तकी प्रमाणे नर्तन करत होती. रंगो भटाची सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली असावी.

बहारो फूल बरसाओ - ५

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/07/2022 06:34 या दिवशी प्रकाशित केले.

टिंग टाँग..... टिंग टाँग..... कोण येडचॅप आहे हा माणूस.... आता दार उघल्यावर बुक्कीच मारते तोंडावर त्याच्या. मी धावत दार उघडते.
टू माय सरप्राईज.... ओह्ह्ह्ह माय गॉड....... माझे डोळे विस्फारले आहेत.. तोंड आख्खा पंजा आत जाईल इतकं सताड उघडं पडलंय.
मागील दुवा https://misalpav.com/node/50468

बहारो फूल बरसाओ - ४

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 21/07/2022 23:07 या दिवशी प्रकाशित केले.

तो दिसला...... माझे डोळे बहुधा एल ई डी बल्ब लागल्यासारखे चमकले असणार. नक्कीच. पण हे त्याच्या बरोबर कोण आहे. तो एका बाई सोबत बोलतोय. वयाने त्याच्या एकढीच असेल. त्या मुलीच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो हात पुढे करतो. ते मूल त्याच्या कडे बघून हसंत त्याच्या कडे झेपावलंय. ते मूल आता त्याच्या कडेवर आहे.