Skip to main content

विरंगुळा

दंतकथा

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 31/03/2022 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
कुठलाही प्रवास मला आवडतो. अगदी कमी अंतरावरचा रिक्षातला सुद्धा. काय एक एक नमुने दिसत असतात. पण फक्त नमुनेच पाहिले पाहिजेत असं नाही. आत्ताच मेट्रोने (पुण्यातली नाही, आधीच स्पष्ट करतो) प्रवास करताना एक खूपच गोड म्हणता येईल असं एक कुटुंब सोबत होतं. त्यात एक सर्वात गोड अशी मुलगी होती. वय असेल अंदाजे 5-6 वर्षे. इथे हैदराबादला परकर पोलकं घालणाऱ्या मुली सर्वत्र असतात. त्यामुळेच की काय छान दिसत होती. तिचा दादा असेल 10-12 वर्षाचा. तर तो तिला सारखं मास्क लावण्याविषयी टोकत होता. पण ह्या मुलीचे वरचे 4 दात पडले होते आणि त्याचा कोण आनंद तिला झाला होता!

माझी राधा - ३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 18/03/2022 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
भटियार चे स्वर मनामधे रुंजी घालत रहातात. त्यापासून एकदम बाजूला होता येत नाही. स्वरांना असं झट्कून टाकता येत नाही. आरोह अवरोहाच्या वेलबुट्ट्या मनात गुंजतच रहातात. बासरी ओठाला लागलेलीच आहे. मी त्यात स्वरांची फुंकर घालतो. मागील दुवा सा ध प म , प ग रे सा. पंचम गंधार घेत कोमल ऋषभावरुन षड्जावर येताना काही वेगळेच रंग डोळ्यासमोर उभे करतो हा राग. कोणी शोधला असेल. ज्या कोणी शोधला असेल त्याने तो अनुभव घेतला असेल. सामवेदात उल्लेख आहे याचा. पण संगीत हे अपौरुषेयच. अमूर्त. अनुभवायचेच. स्वर कानावाटे ऐकू येतात पण ते अंगात भिनतात. मग अलौकीक अनुभव देतात. बासरीचा नाद अनहत. तो तुमच्या रोमारोमात जातो.

माझी राधा - २

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 14/03/2022 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
न ठरवताही अचानक कोमल ऋषभ स्वर येवून जातो. जीव कसावीस करणारा हा स्वर.एक तर तन्मय होऊन आसपासाच्या जगाला विसरून उत्कटतेने वाजवत रहावे किंवा सर्वसंग परित्याग करून दूर कुठेतरी निघून जावे अशी काहीशी भावना जागवणारा हा स्वर.
आजकाल हे असं का झालं आहे तेच समजत नाही. या राज्यकारभारापासून दूर कुठेतरी निघून जावे असे वाटते पण एकटेपणाला आपण घाबरतोय. दिवस राज्यकारभारात व्यतीत होतो. कामात मग्न असल्यामुळे एकटेपणाची जाणीव होत नाही. रात्री एकटे असल्यावर डोक्यात विचारांचे काहूर माजते. सगळा इतिहास डोळ्यापुढे येत रहातो. उगाचंच.

माझी राधा

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 12/03/2022 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरात्र झाली आहे. कसल्याशा चाहुलीमुळे मी जागा झालो आहे. उत्तररात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांच्या आवाजाशिवाय दुसरा कसलाच आवाज नाही. नाही म्हणायला दूरवरून अस्पष्ट ऐकू येणारी समुद्राची गाज ऐकू येतेय. गवाक्षाबाहेरून येणारा प्राजक्ताच्या फुलांचा गंध वातावरणातील प्रसन्नता आणखीनच वाढवतोय. इतक्या शांततेची सवय जवळजवळ संपलीच आहे. आजकाल वेळच कुठे असतो शांततेसाठी आपल्या कडे. दिवसभर काही ना काही चालूच असतं. कोणी ना कोणी सोबत असतंच. आपण एकटे असे नसतोच कधी. माझेच विचार मला मोठ्याने ऐकायला येताहेत. काहीतरी धूसर आठवतंय. ते आपल्या हातातून निसटून गेलंय. हे प्रकर्षाने जाणवतय.

भटकंती.....

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 11/03/2022 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
"घरातून बाहेर पडलास तर तंगड्या तोडून हातात देईन," आईनं दम दिलेला. दम देण्याची तिची ही नेहमीची पद्धत. मला माहित होतं आपल्या तंगड्या बिंगड्या काही तूटणार नाहीत, पण रट्टे पडतील या भीतीने डोळे बंद करून खाटेवर नुसता पडून होतो. डोळ्यासमोर दिसत होते उनाडक्या करत हिंडणारे मित्र. कितीही प्रयत्न केला तरी झोप येत नव्हती. दुपार चांगलीच तापली होती.संध्याकाळी झाडांना गदगदा हलवणारा वारा म्हाताऱ्या माणसासारखा कुठेतरी झोप काढत असावा. कूस बदलावी तशी झाडाची पानं मधूनच हलू लागायची अन् वाटायचं वाऱ्याची गार झुळूक अंगाला स्पर्श करून जाईल. पण, तसं होत नव्हतं. खूपच उकडत होतं.

एकदिवसीय क्रिकेट, महिला विश्र्वचषक-2022

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 08/03/2022 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीतरी, ह्या विषयावर धागा काढेल, असे वाटले होते, म्हणून थांबलो होतो... 2017 पासून, भारतीय महिला, ह्या प्रकारच्या खेळांत चांगल्याच प्रवीण झाल्या आहेत... पण, व्यक्तीपूजेच्या शापातून, अद्याप तरी, ह्या संघाची सुटका झालेली नाही. मिताली राज आणि हरमन प्रीत कौर, यांना अजूनही संघात का घेतले आहे? हा एक अनाकलनीय प्रश्र्न .... ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, यांच्यात अंतिम सामना होण्याची शक्यता जास्त आहे, हे माझे वैयक्तिक मत ...

सामना (३)

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 27/02/2022 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सामना (३) (पूर्वसूत्र: वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात सव्वीस जानेवारीला होणारे क्रिकेट सामन्यासाठी,अनेक अडचणींना सामोरे जात न्यायाधीश संघाने तयारी केली आहे.आणि सामन्याचा दिवस .)     शेवटी तो दिवस एकदाचा उजाडला.झेंडावंदनानंतर साडेदहा वाजता,वकील संघ विरुद्ध न्यायाधीश संघ यांच्यात कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामना होणार होता.तालुक्याहून ठोंबरे व आणखी दोन न्यायाधीश ( दि.न्या.क.स्त) हे संघातील खेळाडू वेळेत पोहचले होते.सामन्यासाठी मैदान सज्ज झाले होते.मंडप  उभारलेला होता.तो वकील,न्यायाधीश,त्यांचे कुटुंबीय, कर्मचारी यांच्या उपस्थितीने भरला होता.पंचगिरी करण्यासाठी दोन स्थान

मी मोठा झालो.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 25/02/2022 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला.. "गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय! "थांब जरा," मी म्हणालो. आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं, "या वर्षी तुम्ही दहावीला आहात, लक्षात ठेवा. खेळ बंद... दांड्या मारायच्या नाही...

सामना (२)

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 23/02/2022 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
सामना (२) ( पूर्वसूत्र: न्यायालयातील ल्यायब्ररीत एका महत्वाचे विषयावर चर्चेसाठी, न्यायाधीशांची बैठक,कुमठेकर साहेबांनी बोलावली आहे.तिथे ते संबोधन करत होते.) स्वागत समारंभ असो,निरोप समारंभ असो वा बाररुम मधला कार्यक्रम,कुमठेकरांनी बोलण्याची ठराविक पध्दत विकसित केली होती.न्यायाधीश,त्यांचे समाजातील स्थान,त्यांचे न्यायालयातील आणि न्यायालयाबाहेरील वर्तन कसे असावे यावर श्रोत्यांचे किमान पाच मिनिटे प्रबोधन केल्याशिवाय मुळ विषयाकडे त्यांची गाडी वळत नसे.तो प्रबोधनाचा भाग,त्यातील उदाहरणांसह,बहुतेकांना पाठ होता. त्यामुळे तो संपेपर्यंत बहुतेक सर्वजण आपण फार लक्षपूर्वक ऐकतो आहोत असे भासवत,आपापल्यातच मग्न ह

दिल का रिश्ता

लेखक पाटिल यांनी सोमवार, 21/02/2022 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिल का रिश्ता. इसवी सन- २००३ जय मेहता- अर्जुन रामपाल टीया- ऐश्वर्या रॉय जयचा बाप- परेश रावळ अनिता- ईशा कोप्पीकर टीयाची आई- राखी सुरूवात. जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी रावळपापा लंडनहून घराकडे निघालेत. रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी आरोळी ठोकतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो. दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळते. दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला दोन तास लेट झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..! पण काय हरकत नाय बरं का पापा..