मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरंगुळा

अनंत चतुर्दशी

कर्नलतपस्वी ·
आज अनंत चतुर्दशी.दूरदर्शनवर गणपती विसर्जन व मिरवणुकीची दृश्ये दाखवत होते.लालबागचा राजा,कसबा गणपती, नागपूरचा राजा,कधी नाशिक कधी नागपूर शहरातली दृश्ये ,जणू दूरदर्शन संजय आणी मी धृतराष्ट्र. जसे वय वाढते तसे येणारा प्रत्येक दिवस भूतकाळात जरूर घेऊन जातो. तसाच आजचा दिवस सुद्धा.... एक दोन तीन चार .... माणिक मोती बडे हुशार.... आमच्या लहानपणीच्या गणेशोत्सवाची दृश्ये डोळ्यासमोर तरळून गेली. तेव्हा ना दूरदर्शन होते ना विज.

आईस्क्रीम!

उगा काहितरीच ·
उण्यापुऱ्या ६०-७०-८० वर्षांचं आयुष्य आपलं. त्यातही जवळजवळ १/३ झोपेतच जाते. बाकी तर हिशोब सोडूनच द्या. जेव्हा पहिल्यांदा समज येते बहुतेकजण शाळेतच असतात. काही लोक कदाचित कॉलेज मध्ये वा पन्नाशीतही असू शकतात तो भाग निराळा ! त्या वयात मौज मजा म्हणजे काय हो मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळणे, हातगाडीवर मिळणारे आइस्क्रीम खाणे, कधी मिळालेच तर रेस्टॉरंट मध्ये वडिलांसोबत जाऊन मसाला डोसा खाणे बस ! पण नाही एवढ्या साध्या गोष्टीचे पण काही परिणाम असू शकतात नाही का? दहावी / बोर्ड वगैरे राक्षस पण असतातच मानगुटीवर बसलेले. एकदा दहावी होऊ दे रे मग काय कॉलेज मध्ये कर जेवढी मौजमजा करायची ते.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

अनुनाद ·
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

टर्मीनेटर ·
.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } 'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट. परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही MX Player वर 'Day Of The Mummy (Hindi Dubbed)' हा हॉरर चित्रपट लावला होता.

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

पाषाणभेद ·
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे.

नर बळी

देवू ·
ह्या वाक्यातील क्रियापद कोण सांगू शकेल? अख्ख्या वर्गाने हात वर केले , फक्त मी सोडून. उत्तर येत नसले तरी सर्वांबरोबर आपणही हात वर केल्यास आपल्याला विचारण्याची शक्यता कमी होत असल्याने बरेच जण तसे करायचे. मी हात वर न केल्याने मला बाई नक्कीच उत्तर देण्यासाठी विचारतील ह्याची खात्री होती. त्याला कारणही तसेच होते. मी कुठलेही मराठी व्याकरण न शिकता बालवाडीची मुलाखत मराठीत देऊन प्रवेश मिळवला होता.

टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)

निमिष सोनार ·
"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" हेसुध्दा तोच म्हणाला होता ना! पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का! असो, तर मूळ मुद्दा असा आहे की पोह्यात लिंबू पिळण्याआधी बिया (कारल्याच्या सॉफ्ट बहिणी) निघून जाव्या म्हणून अर्धा कापलेला लिंबू जर आपण प्लेटबाहेर हलकाच दाबला तर हटकून त्यातील रस निघून वाया जातो पण बिया मात्र हट्टाने लिंबामध्येच राहतात.

ब्रह्मानंदी

कर्नलतपस्वी ·
इ. स. १८५९-६० सालची चिपळूण मधली सकाळ,कदाचीत पावसाळी असावी. रंगो भट नुकतेच पुजा अर्चना करून पडवितल्या लाकडी झोपाळ्यावर सुपारी कातरत बसले होते. आडकित्याच्या आवाजात झोपाळ्याचा 'कर्र ~, ~कर्र' आसा लयबद्ध आवाज मीसळून नादब्रह्म निर्माण होत होते. रंगो भटाच्या संजाबा वरची शेंडी प्रशिक्षीत नर्तकी प्रमाणे नर्तन करत होती. रंगो भटाची सुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागली असावी. तेवढ्यात रूबाबदार लष्करी गणवेशातला एक हरकारा त्यांच्या चौसोपी वाड्याकडे येताना पाहून आजूबाजूच्या वाड्यात खळबळ माजली. सगळे अंदाज घेत होते कुणाकडे हा राक्षस आला आसावा.

बहारो फूल बरसाओ - ५

विजुभाऊ ·
टिंग टाँग..... टिंग टाँग..... कोण येडचॅप आहे हा माणूस.... आता दार उघल्यावर बुक्कीच मारते तोंडावर त्याच्या. मी धावत दार उघडते. टू माय सरप्राईज.... ओह्ह्ह्ह माय गॉड....... माझे डोळे विस्फारले आहेत.. तोंड आख्खा पंजा आत जाईल इतकं सताड उघडं पडलंय. मागील दुवा http://misalpav.com/node/50468 माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसत नाहिय्ये. दारात माया आणि समीर उभे आहेत.मी अवाक झाले आहे.काही सूचतच नाहिय्ये. माया तू! व्हॉट अ सरप्राईज! आनंदाने किंचाळते. मायाला घट्ट मिठी मारते. कोण आलंय गं! माया का गं! आई विचारतेय. माझ्या आनंदाने किंचाळण्यावरून आईनेच काय कोणीही ओळखले असते.

बहारो फूल बरसाओ - ४

विजुभाऊ ·
तो दिसला...... माझे डोळे बहुधा एल ई डी बल्ब लागल्यासारखे चमकले असणार. नक्कीच. पण हे त्याच्या बरोबर कोण आहे. तो एका बाई सोबत बोलतोय. वयाने त्याच्या एकढीच असेल. त्या मुलीच्या कडेवर एक लहान मूल आहे. तो हात पुढे करतो. ते मूल त्याच्या कडे बघून हसंत त्याच्या कडे झेपावलंय. ते मूल आता त्याच्या कडेवर आहे. मागील दुवा http://misalpav.com/node/50403 मला काय करावं सुचत नाहिय्ये. गाढ झोपेत असताना तोंडावर कोणीतरी थंडगार पाण्याचा हबका मारावा तसा धक्का बसलाय. माझ्या हातून रीटर्न गिफ्ट खाली पडतात. आणि जिन्यावरून घरंगळतात. त्यात काय आहे माहीत नाही पण जे काही आहे ते काचेचं नसावे. मी प्रार्थना करतेय.