बेगम बर्वे - एक डोक्यावरून गेलेले नाटक
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about बेगम बर्वे - एक डोक्यावरून गेलेले नाटक
- 17 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
परवाच (१ मार्च) सतिश आळेकरांचे प्रचंड गाजलेले 'बेगम बर्वे' नाटक मूळ संचात (स्वतः आळेकर, चंद्रकांत काळे, मोहन आगाशे वगैरे) पहायचा योग आला. नाटकाची खूप किर्ती ऐकली होती, त्यामुळे अगदी उत्सुकतेने ते नाटक पाहिले, पण फारसे झेपले नाही! :(
खूप प्रश्न पडलेत -- इथे मिपावर जाणकार माहिती देतील अशी आशा आहे. हे नाटक प्रामु़ख्याने स्त्री भुमिका करणार्या, बालगंधर्वांना आदर्श मानणार्या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे. पण मग काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीच. नलावडे बाई म्हणजेच बर्वे - हे कसे काय? पुढे तिचे/त्याचे लग्न, एकत्र राहणे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेत आहे का? शिवाय ते दिवस राहणे??