Skip to main content

समीक्षा

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 09/12/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो.. ओळख ना पाळख.. लेखक : सुरेश जयराम दिग्दर्शक : मंगेश कदम निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...

गझनी बघण्याआधी ....

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 06/12/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांच्या आनंदावर विरजण घालणे हा आमचा आवडता छंद नव्हे जणु काहि आम्ही त्यासठिच जन्म घेतला आहे हि आम्हास खात्री आहे. अमीर खानच्या गझनी ची जे चाहते डोळ्यात प्राण आणुन वाट पहात आहेत त्यांना आत्ता पर्यंत ह चित्रपट कोणा तामिळ का तेलगु मुव्हीचा रिमेक आहे हे कळाले असेलच ! पण खरे तर हा चित्रपट २००० साली आलेल्या "Christopher Nolan" ह्याच्या "Memento" ह्या चित्रपटाची भ्रष्ट नक्कल आहे. जगातल्या श्रेष्ठ २५० चित्रपटांमध्ये ह्याचा २८ वा नंबर लागतो. अत्युच्च अभिनय आणी प्रत्येक प्रसंगात जाणवणारा दिग्दर्शकाचा ठसा हे "Memento" चे वैशिष्ठ्य.

EMI - एकदा तरी बघाच

लेखक योगी९०० यांनी रविवार, 09/11/2008 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
Wednesday नंतर जेवढे नवीन चित्रपट आले, ते मी अर्ध्यावरच सोडून दिले. 'द्रोणा'' तर पहिल्या पंधरा मिनीटानंतरच बंद केला. आज खुपच कंटाळा आला आणि बर्याच दिवसांनी उर्मिला आणि संजूबाबाचा चित्रपट म्हणून EMI बघायला घेतला. अर्थात मान्यवर समिक्षकांनी दोनच स्टार दिले असले तरी थोडा पहावा असा विचार केला. चित्रपट तसा हलका फुलकाच आहे. पण आशय महत्वाचा. "कर्ज काढून सण साजरे करू नये" हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तशी कथा चार वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर फिरते. सर्वानाच पैसा हवा आहे.

न्युपोर्ट् वरिल संध्याकाळ

लेखक सूर्य यांनी शनिवार, 08/11/2008 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, सध्या मी जिथे काम करतो आहे, ते आहे न्युपोर्ट, न्यु जर्सी इथले ठिकाण. संध्याकाळच्या वेळेस इथे मस्त वातावरण असते. ते टिपण्याचा प्रयत्न केला आहे. हे आहे न्युयॉर्क सिटीचे न्युपोर्ट वरुन होणारे दर्शन. NewPort - 1 हे माझे ऑफीस. इथे चौदाव्या मजल्यावर सकाळपासुन कॉम्प्युटरमधे डोके घालुन बसलेलो असतो. ;).

तुफान विनोदि विचित्रपट देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 06/11/2008 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI दिग्दर्शक :- जगदिश शर्मा प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८ -------------------------------------------------------------------------------- कलाकार :- क्रिश्णा अभिषेक, ह्रुषीता भट्ट, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर,कादर खान, कमाल रशिद खान, रवि किशन, रज़ा मुराद, चंकी पांडे, निर्मल पांडे, रणजीत, शिवा रिंदानी, किम शर्मा, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग, मनोज तिवारी, मुकेश तिवारी. तुफान विनोदि आहे हा विचित्रपट.

चित्रपट परिक्षण - टिंग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 05/11/2008 05:57 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्कर साठी चर्चिला गेला असल्याने श्वासप्रमाणे अपेक्षा ठेऊन मंगेश हडवळेंचा टिंग्या बघायला घेतला. ज्वलंत विषय, उत्तम स्थळ निवड, चपखल भाषा, खोलवर उतरणारे पार्श्वगीत तसेच योग्य वातवरण निर्मिती मुळे पहिल्या पाच-दहा मिनिटात या अपेक्षा अजूनच वाढू लागतात. परंतू दुर्दैवाने चित्रपट पुढे सरकने हळूहळू बंद पडते की काय येवढा संथ होतो. काही वेळाने तर पुढे काय घडणार, कशा प्रकारचे संवाद ऐकायला मिळणार याचा सुद्धा अंदाज बांधता येऊ लागतो. अन टिंग्या ऑस्कर साठी का निवडला गेला नाही याची एक एक करत कारणे समोर येऊ लागतात. शरद गोयेकर या बालकलाकाराने टिंग्याच्या व्यक्तिमत्वाला खूप चांगला न्याय दिला आहे.

पुस्तक परिचय : कोसळेपर्यंत

लेखक निमीत्त मात्र यांनी रविवार, 02/11/2008 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव घेणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळ्याचे चटके चित्रित करणाऱ्या कवितांची दाटीवाटी असलेला प्रा. राजेंद्र दास यांचा "कोसळेपर्यंत' हा कवितासंग्रह, एका विशिष्ट लयीत सामाजिक आशयाचे भान ठेवून बापूजी (म. गांधी), ज्योतिबा फुले, येशू ख्रिस्त यांच्या दुःखालाही गवसणी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कविता वाचकाला विचारमग्न करतात. "दुष्काळ' ही अभंग छंदातील कविता अतिशय मर्मभेदक आहे. कोरडी नक्षत्रे। मातीला मरण।। पेटले सरण। जितेपणी।। ही त्यांनी व्यक्त केलेली भुईची भावना अतिशय वेधक आहे.

विक्रमादित्य

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 20/10/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल.

माझ्या हिंदीचा बोलु कवतिके

लेखक भोचक यांनी बुधवार, 15/10/2008 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला हिंदी चांगलं कळतं असं मराठी माणसाला उगाचच वाटत असतं. म्हणजे त्यात थोडं तथ्य नक्कीच आहे. अहिंदी भाषिकांमध्ये मराठी लोकांनाच हिंदी जास्त चांगली कळते आणि बोलताही येते. पण म्हणून आपण आपली संपूर्ण अभिव्यक्ती त्या भाषेत करू शकतो असं नाही. आता हा अनुभव महाराष्ट्रात तितका येणार नाही. पण उत्तरेकडे गेल्यानंतर अनेकदा हिंदी चांगली समजत असूनही अनेकदा आपला 'मोरू' होतो. इंदूरमध्ये सुरवातीला आल्यानंतर हिंदीत संवाद साधणं काही कठीण नाही, अशीच भावना होती. पण काही दिवसात आपोआपच विकेट पडायला सुरवात झाली. बायकोने एकदा तूप आणायला लावलं. इथे दुध-दुभतं भरपूर. त्यामुळे त्याची दुकानही बरीच.

डोक्यात जाणार्‍या जाहिराती

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 27/09/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
शितलनी मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती हा धागा सुरु केला. त्याचबरोबर अशाही काही जाहिराती असतात ज्या अगदी डोक्यात जातात. समोरचा प्रेक्षक मुर्ख आहे, त्याला काही समजत नाही हे गृहीत धरून केलेल्या जाहिराती. मी मला आठवणार्‍या अशा जाहिराती सांगतो; तुम्ही पण तुमच्या डोक्यात जाणार्‍या जाहिराती सांगा. १) हार्पिकः अक्षरशः पिवळं पडलेले टॉयलेट दाखवून (एवढं पिवळं होऊस्तोवर कोण ठेवेल तसच) डोकं फिरवतात. नेमकी ती जाहिरात जेव्हा जेवायला बसलेलो असतो तेव्हाच लागते २) विसा पॉवर: शंकर-एहेसान-लॉयनी केलेली अतिशय टुकार जाहिरात.