ईडीयट बॉक्स & बालिका बधु..
टिव्ही ला ईडीयट बॉक्स का म्हणतात? खरा तो नुस्ता बॉक्स आहे, आणि इडियट आपण समोर बसुन कुठलेही भंकस कार्यक्रम बघणारे. हिटलरने ब्रेन वॉश करण्यासाठी , एकच गोष्ट वारंवार सांगणे हेच साधन वापरले होते.
टिव्ही मुळे पण नेमकं हेच होतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला वारंवार दाखवल्या जातात आणि मग आपल्याला त्याच बरोबर आहे असं वाटायला लागतं.
हल्ली एक कार्यक्रम सुरु झाला आहे बालिका बधु नावाचा कलर्स चॅनल वर. आमच्या घरी डायनिंग टेबल मुंबई च्या पध्दती प्रमाणे हॉल मधे आहे आणि नेमकं तेंव्हा माझं जेवण सुरु असतं म्हणुन इच्छा असो वा नसो, ती सिरियल पहावीच लागते.
ह्या सिरियल मधे एका ८ वर्षाच्या मुलीचं लग्न होऊन ती सासरी गेलेली दाखवलं आहे. ही सिरियल पहाताना मला अगदी “सिक” फिलिंग येतं.त्या लहानशा मुलिवरचे तिच्या आजेसासुने केलेले मानसिक अत्याचार .. आणि कधी तरी शारिरिक पण बघुन कसंसच होतं .
ज्या गोष्टी पहातांना मला इरिटेट होतं त्याच गोष्टी स्त्रियांना खुप आवडतात.एखादी गोष्ट वाईट आहे हे समजुन सुध्दा ती गोष्ट सारखी पहाविशी वाटणं ही कुठली सायकॉलोगिकल डीसॉर्डर? एका स्त्रिवर होणारे अत्याचार (नाटकात किंवा सिरियल मधे का होइना) दुसरी स्त्री पाहुन एंजॉय कसे करु शकते?. एखादा सायकॉलॉजिस्टच ह्यावर काही तरी प्रकाश घालु शकेल.
खरं तर हे असले काहितरी सिरियल्स पाहुन इतर पहाणाऱ्या स्त्रियांना संताप येणं अपेक्षित आहे, पण तसं होत नाही, उलट स्त्रियाच त्या बालिका बधु वर प्रेम करु लागतात .
ह्या लहान मुलांच्या म्हणजे ८ वर्षाची मुलगी आणि १२वर्षाच्या मुलाच्या संबंधामधे रोमॅंटिझम शोधणाऱ्या लोकं मानसिक दृष्ट्या विकलांग आहेत असे वाटते. मॅच्युरिटि कमी म्हणुन असे सिरियल्स बघितले जातात ,मनातले विकृत विचारांमुळे- की उगिच वेळ जात नाही म्हणुन? कुठलेही कारणं काही फारशी एन करेजिंग नाहीत..
ह्या सिरियलची ही बालिका बधु मध्यंतरी न्युज चॅनल वर पण यायची. ती लहानशी मुलगी डोक्यावर पदर घेउन आणी लेहेंगा चुनरी घेउन जेंव्हा दाखवतात, तेंव्हा सौ. ला ती गोड दिसते आणि मला पॅथेटीक… अगदी कीव येते तिची. येता जाता ते गाणं छोटिसी ये —- सुरु झालं की मला तर मळमळतं हल्ली.
वाचने
2530
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
खरंतर अशा
कै च्या कै
In reply to कै च्या कै by दीपुर्झा
खरयं ..
मी जमेल
बालिका
In reply to बालिका by अविनाशकुलकर्णी
प्रेक्षक मूर्ख असे समजून ?
बकवास वेळ जातो.
ज्या
अहो, मी